भोर – वरंध घाटात इको कार ५०० फुट दरीत कोसळल्यामुळे १ ठार ८ जखमी..

उपसंपादक : राकेश देशमुख



भोर : महाड भोर महाड मार्गावरील वरंधा घाटातील उंबर्डेवाडी (ता.भोर) येथील वळणावरुन महाडकडून भोरच्या दिशेने जाणारी चारचाकी इको गाडी एम एच १२ यु जे ९९५७ अंदाजे ५०० फुट दरीत कोसळून सोमवार दी.२७ रोजी पहाटे चारच्या सुमारास अपघात झाला आहे.अपघातात एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले असून सर्व पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून अपघाताचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आपघातात शुभम शिर्के (वय २२ जनता वसाहत पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. तर मंगेश गुजर (वय२६, दत्तवाडी), अशोक गायकवाड (वय २९ रा.भवानीपेठ), सिद्धार्थ गणधने ( वय २६ रा.दांडेकर पुल), सौरब महादे ( वय २२ रा.पर्वती), गणेश लावंडे (वय२७ रा.धायरी) अभिषेक रेळेकर (वय २५ रा.नारायण पेठ), यशराज चंद्रलोकूल (वय २२ घोरपडे पेठ) आणि आकाश आडकर ( वय २५ रा. दत्तनगर) अशी जखमींची नावे आहेत. भोर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून स्थानिक व सह्याद्री रेस्कू टीमच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आले असून मृतदेह व जखमींना भोर उपजिल्हा रुग्णालयात येथे पाठविण्यात आले आहे. भोर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार राहुल मखरे, सुनिल चव्हाण, सागर झेंडे, वारवंडचे पोलिस पाटील सुधीर दिघे, स्थानिक ग्रामस्थ भाऊ उंब्राटकर, विठ्ठल पोळनिलेश उंब्राटकर,अक्षय धुमाळ, निलेश पोळ यांनी घटनास्थळी पोहचून मदत केली. या संपूर्ण अपघाताचा पुढील तपास भोर पोलिस करीत आहेत.