रायगड जिल्ह्यातील रोठ बुद्रुक, धाटाव रोहा येथे खा.स्था. वि. नि. भव्य एम. बी. मोरे फाऊंडेशनच्या महाविद्यालय इमारतीचा भूमिपूजन व नामकरण सोहळा संपन्न…

0
Spread the love

उपसंपादक – राकेश देशमुख

रोहा :– या कार्यक्रमाला रायगड जिल्ह्याचे खासदार मा. श्री सुनिलजी तटकरे साहेब, कृषिमंत्री श्री धनंजय मुंडे साहेब , आमदार श्री अनिकेत तटकरे साहेब उपस्थित होते.

ही भव्य वास्तु रायगड जिल्ह्यातील युवक-युवतींच्या भवितव्याला उजाळा देणारी ठरेल. तसेच रायगड जिल्ह्याच्या विकासात एक पाऊल पुढे टाकण्यासाठी या महाविद्यालयाचा मोठे योगदान लाभेल, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.

या भुमीपूजन कार्यक्रमाला आई श्रीमती वरदा सुनील तटकरे, वहीनी श्रीमती वेदांती अनिकेत तटकरे, एम. बी. मोरे फाउंडेशनचे संस्थापक श्री विजय मोरे, उपाध्यक्ष श्री विनोद पाशिलकर, रोहा पंचायत समिती मा. उप सभापती सौ. विजया पाशिलकर, रायगड सरचिटणीस श्री सुरेश मगर, ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील, धाटाव सरपंच सौ. सुवर्णा रटाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. शंकरराव भगत, युवक अध्यक्ष श्री जयवंत मुंढे, रोहा इडं. असो. अध्यक्ष श्री पी.पी. बारदेशकर तसेच रोहा, म्हसळा, माणगाव, श्रीवर्धन तालुकाध्यक्ष आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट