पालघर येथे जिल्हा क्रीडा संकुलाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन…

उपसंपादक- मंगेश उईके
पालघर :-आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल मुख्य भूमिका बजावेल..! दि. 30 /09/2024 रोजी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी राज्य शासनाचे जिल्हा क्रीडा संकुल मुख्य भूमिका बजावेल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.




पालघर जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमिपूजन टेंभोडे येथे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी चव्हाण हे बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, माजी खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने तसेच खेळाडू आणि विद्यार्थी उपस्थित होते.
खेळाला विशेष प्राधान्य देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन विशेष प्रयत्न करत असून खेलो इंडियाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पालघर जिल्ह्यातील तरुणांना क्रीडा क्षेत्राचे विशेष आकर्षण असल्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यामध्ये क्रीडा संकुल व्हावे अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून क्रीडा संकुलाचे आज भूमिपूजन करण्यात आले आहे. विविध क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. खेळाडूंना विविध सुविधा पुरवण्यासाठी क्रीडा क्षेत्रामध्ये उद्योजक, नागरिक तसेच स्वयंसेवी संस्था यांनी योगदान दयावे. असे अवाहनही पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com