भोंसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना विषबाधा ? २८ विद्यार्थी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल…
उपसंपादक-राकेश देशमुख
महाड:– भोंसला मिलिटरी स्कूल नाशिक येथील विद्यार्थी सहलीसाठी २८ जानेवारी रोजी रायगड मध्ये आले असता किल्ले रायगड येथील ऐतिहासिक स्थळांना भेट दिल्यानंतर ३० जानेवारी सायंकाळी किल्ले प्रतापगड कडे निघाले असता रात्री पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृह येथे वास्तव्यास थांबले.
तेथेच रात्रीचे जेवण देखील करण्यात आले. परंतु यातील २८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने उलटी, जुलाब, ताप, थंडी यांसारखे त्रास होऊ लागल्याने सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.
पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक भाग्यरेखा पाटील, डॉ. वाघटकर यांसह संपूर्ण टीमने विद्यार्थ्यांवर वेळीच उपचार सुरू केले. घटनेची माहिती पोलादपूर पोलिसांना मिळताच पोलादपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज म्हसकर, उपनिरीक्षक उदय धुमासकर यांसह संपूर्ण टीम पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली.
विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची वार्ता वेगाने पसरली. प्रस्तुत प्रतिनिधीने सहलीचे समन्वयक संतोष गणपत जगताप यांच्याकडे माहिती घेतली असता स्टिंग व इतर शित पेयांचे सेवन केल्याने व अती प्रवासामुळे हा त्रास झाला असावा असे सांगितले. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक भाग्यरेखा पाटील यांनी सकाळी ८ वाजता दाखल झालेल्या २८ विद्यार्थ्यांपैकी १० विद्यार्थी अवस्थ असल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आल्याचे विस्टा न्यूज शी बोलताना सांगितले.
विद्यार्थ्यांच्या उलटीचे व संडासचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांना हा त्रास नेमका कशामुळे झाला यासाठी विद्यार्थ्यांचे उलटी, संडास चे नमुने तपासण्यात यावे अशी चर्चा जनसामान्यामध्ये आहे.
मात्र या घटनेनंतर विद्यार्थ्यांना सहलीसाठी पाठविणाऱ्या पालकांचा विश्वासघात होतोय का..?विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे, विद्यार्थ्यांची काळजी घेण्यामध्ये समन्वयकांकडून गाफीलपणा होतोय का.? पैसे वाचविण्याच्या प्रयत्नात संयोजक निकृष्ट दर्जाचे भोजन विद्यार्थ्यांना देऊन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करत आहेत का. ? अशा उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com