निवडणूक आयोगाच्या चेक नाक्यावरील पोलीसांवर दगडफेक करणारा भिवंडी गुन्हे शाखा २ च्या ताब्यात..

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

भिवंडी :– लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने उभारलेल्या चेक पोस्टवरील पोलिसांवर दगडफेक सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात आले. ही कारवाई भिवंडीच्या गुन्हे शाख २ च्या पथकाने केली.

लोकसभा २०२४ या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याच्या सिमांवर निवडणूक आयोगाने तपासणी नाका (चेक पोस्ट) उभारले आहे. सदर ठिकाणी पोलिसही तैनात आहेत. नरोली पोलीस स्टेशन, दादरा नगर हवेली, दिव दमण येथे देखील वरीलप्रमाणे स्थित तपासणी नाका (चेक पोस्ट) उभारण्यात आला होता. या ठिकाणी गोवंश चोरीच्या उद्देशाने चारचाकी गाडीमधून काही इसम आले.

त्यांच्यावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी वाहनाची तपासणी करण्याचे उ‌द्ददेशाने नरोली पोलीस स्टेशन, दादरा नगर हवेली, दिव दमणचे स्थित तपासणी नाक्यावरील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, असता त्यांनी पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली, सरकारी साहित्यांचे नुकसान केले व पोलीस अंमलदार यांचा मोबाईल फोनची जबरी चोरी केली. या प्रकरणी नरोली पोलीस स्टेशन, दादरा नगर हवेली, दिव दमण येथे अनोळखी इसमांच्याविरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक २२/२०२४ भारतीय दंड संहीता कलम ३५३, ३९२, ४२७, ३४ प्रमाणे दिनांक २०/०४/२०२४ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हल्ला करणारे आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्याअनुषंगाने अनोळखी आरोपी यांच्या वाहनाच्या वर्णनावरून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. आरोपींनी स्वतःची ओळख लपविण्याचे उद्देशाने तोंडास रूमाल बांधला असल्याने त्यांची ओळख पटत नव्हती. करीता सदरचे फुटेज संबंधित पोलीस ठाण्याकडून सर्व ठिकाणी पाठवुन आरोपी यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू होता.

सदरचे फुटेज नरोली पोलीस स्टेशन, दादरा नगर हवेली, दिव दमण चे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक स्वानंद इमानदार यांच्यामार्फत गुन्हे शाखा घटक २, भिवंडीचे नेमणुकीतील हवालदार अमोल देसाई यांना प्राप्त झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर फुटेजमधील अनोळखी आरोपी हवालदार अमोल देसाई व अंमलदार अमोल इंगळे यांनी निष्पन्न केले. सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून यांच्यापैकी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार मोहसीन अनिस कुरेशी (वय ३२ वर्षे, रा. ठि. पिली बिल्डींग, २ रा माळा, कसाईवाडा, हसीन टॉकीजच्या मागे, भिवंडी, जि. ठाणे) याची ओळख पटली. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले असुन त्यास नरोली पोलीस स्टेशन, दादरा नगर हवेली, दिव दमण चे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री. स्वानंद इमानदार यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक २, भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड, सपोनि धनराज केदार, हवालदार अमोल देसाई, अंमलदार सचिन जाधव, अमोल इंगळे यांनी केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट