विमानाने येऊन मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला भिवंडी गुन्हे शाखा २ ने जेरबंद करून २२ गुन्ह्यांची केली उकल…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

ठाणे :-ठाणे : आसाममधून विमानाने येऊन मुंबई, ठाणे व नवी मुंबईत घरफोड्या करणाऱ्या सराईत आरोपीला तुरुंगात धाडण्यात आले. ही कारवाई भिवंडी गुन्हे शाखा घटक २ च्या पथकाने केली. हा आरोपी हाती लागल्याने २२ गुन्ह्यांची उकल झाली आहे. या कारवाईत पोलिसांनी ६२ लाख २४ हजार रुपयांचे ८८९ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता घरफोडी चोरीच्या गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने सुचना दिल्या होत्या. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील यांनी विशेष पथक नेमले. या पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी घरफोडी चोरीच्या गुन्हे उघडकीस आणण्याकरीता सपोनि धनरान केदार, हवालदार अमोल देसाई, अंमलदार सचिन जाधव, भावेश घरत, अमोल इंगळे यांनी आरोपींचा शोध सुरू केला.

तपासादरम्यान नारपोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या (गुन्हा नोंद क्रमांक ७६०/२०२३ भा. दं. सं. कलम ४५४, ३८०) घरफोडीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत आरोपी मोईनुल अब्दुल मलीक इस्लाम (रा. सामरोली गांव, चौधरी बाजार, ता. जि. होजाई, आसाम) याची तपासी पथकाला माहिती प्राप्त झाली. सदर आरोपी यापुर्वी नवी मुंबई येथे राहण्यास होता.

त्याचेविरूद्ध नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. परंतु सद्या तो फक्त चोरी करण्याकरीता विमानाने प्रवास करून मुंबई येथे येतो व चोरी केल्यानंतर पुन्हा विमानाने प्रवास करून आसाम व नागालँड रा राज्यात लपण्यासाठी पळून जावुन विविध ठिकाणी वास्तव्य करीत होता. त्यांचा राहण्याचा कोणताही ठोस पत्ता नव्हता तसेच मोबाईल फोन देखील वापरत नव्हता, तसेच त्याची ओळख लपविण्याकरीता विग घालत होता. नमुद आरोपी हा रमजान महिना सुरू असल्याने त्याचे आसाम राज्यातील मुळगावी आल्याची माहिती सपोनि धनराज केदार यांना प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आसाम गाठले. सलग ५ दिवस वेषांतर करून मोटरसायकलवर फिरून आरोपीची माहिती मिळवून त्याल ताब्यात घेतले. या कारवाईमुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली, मुंबई व नवी मुंबई शहरातील २२ गुन्ह्यांची उकल झाली असून ६२ लाख २४ हजार रुपयांचे ८८९ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

ही कौतुकास्पद कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक २ भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, सपोनि / श्रीराज माळी, सपोनि / धनराज केदार, पोलीस उप निरीक्षक / राजेंद्र चौधरी, निसार तडवी, हनुमंत वाघमारे, सपोउपनि / रविंद्र पाटील, राजेश शिंदे, पोहवा / सुनिल साळुंखे, देवानंद पाटील, मंगेश शिर्के, रंगनाथ पाटील, शाबीर शेख, किशोर थोरात, शशीकांत यादव, सचिन साळवी, वामन भोईर, राजेंद्र राठोड, प्रकाश पाटील, सचिन सोनावणे, अमोल देसाई, मपोहवा / श्रेया खताळ, माया डोंगरे, पोना/सचिन जाधव, पोशि / अमोल इंगळे, भावेश घरत, उमेश ठाकुर, जालीदर साळुंके, नितीन बैसाणे, चापोशि / रविंद्र साळुंके यांनी केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट