भाईंदर नवयुवक मित्र मंडळाचा पर्यावरण रक्षणाचा संदेश..! बाप्पाची मूर्ती १६ फूट उंच, टिश्यू पेपरपासून बनवली…

उपसंपादक-मंगेश उईके
मीरा रोड :- भाईंदरमधील नवयुवक मित्र मंडळाचा नवघरचा राजाने यंदा २३ व्या वर्षात पदार्पण केले आहे.


हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करताना तो पर्यावरणपूरक साजरा करण्याचा आग्रह मंडळाने केला आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्याची राज्य शासनाची जबाबदारी असली तरी पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे.
कोणतेही सामाजिक बदल आपल्याला आत्मसात करण्यासाठी वेळ लागतो. पण आपली मानसिकता आपण बदलली तर आपण नक्कीच बदल घडवू शकतो, असा मंडळाला विश्वास वाटतो.
नवघरच्या राजाची मूर्ती १६ फूट उंच असून १००००० टिश्यू पेपरपासून बनवलेली आहे. याव्यतिरिक्त २० किलो स्टील, २० किलो खडू पावडर, १० ते १२ किलो गम, डिस्टम्बर आणि पाण्याचा निचरा होऊ नये म्हणून फिनिशिंगसाठी अमेरिकन पेंटचा वापर करण्यात आला आहे. मूर्तीचे वजन १२० ते १२५ किलो एवढे आहे. मूर्ती पाण्यात अगदी सहज विरघळू शकते.
तीन वर्षांपासून नवयुवक मित्र मंडळ पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करीत आहे. या कालावधीत मंडळामार्फत आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, महिलांसाठी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, लहान मुलांसाठी विविध स्पर्धा, श्री गणेश महाभंडारा आणि १० वी १२ उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार असे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
गणेशोत्सवाच्या काळात जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. हे प्रदूषण थांबवणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे, यासाठी नवयुवक मित्रमंडळ पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना राबवत आहे. इतर मंडळांनीदेखील आपला खारीचा वाटा उचलून अशाच पर्यावरणपूरक संकल्पना राबवाव्या आणि पर्यावरणाचे रक्षण करावे, असे आवाहन मंडळाकडून व शिवाजी कदम यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com