भाईंदर पूर्वेकडील पारस नगर ए कॉ हौ सो ली सार्वजनिक सत्यनारायण पूजेचा कार्यक्रम संपन्न

0
Spread the love

प्रतिनिधी-सुशिल तांबे

भाईंदर गेले अनेक वर्ष चालत असलेल्या सार्वजनिक महापुजेचा कार्यक्रम भाईंदर पूर्व मधील पारस नगर ए कॉ हौ सो ली मधील थाटामाटात पार पाडला. विशेष म्हणजे सदर कार्यक्रमाला सोसायटी मार्फत सोसायटीतील मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे व डान्स आणि महाप्रसाद हे कार्यक्रम आयोजित केले गेले होते. विशेष म्हणजे महिला व मुलांसाठी अनेक खेळाचे आयोजन केले होते त्यात मुलांसाठी चमचा गोटी,मटका फोडी व महिलांसाठी ,तळ्यात – मळ्यात,संगीत खुर्ची ,मटका फोडी अशा विविध प्रकारच्या खेळांचा समावेश होता .तसेच महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमाला स्थानिक माजी नगर सेविका व अश्वमेध महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका सौ निलम ढवण मॅडम,समाजसेवक व माजी नगर सेवक,मंथन संस्थेचे संस्थापक श्री राजेश वेतोस्कर साहेब व इतर पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली. सदर कार्यक्रमाला सोसायटीचे अध्यक्ष श्री हेमंत कोदेरे,सचिव श्री सुशिल तांबे,खजिनदार श्री शशिकांत जाधव व इतर पदाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले..सदर आयोजित खेळातील विजेत्या खेळाडूला विशेष बक्षीस देवून व त्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट