आधारसाथी फाऊंडेशनच्या भव्यदिव्य आरोग्य शिबीरास अनेक नामवंत मान्यवरांकडून मनपूर्वक शुभेच्छा..

संपादिका – दिप्ती भोगल
मिरा-भाईंदर :-दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्य दिनाच औचित्य साधुन मिरा भाईंदर पूर्व येथे भव्य दिव्य आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिर आयोजित केले होते.







सदर शिबिरात सर्वांचा खूपच छान प्रतिसाद मिळाला यावेळी आधारसाथी फाऊंडेशनच्या अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक श्री संजय महेता व त्यांचा सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतिशय मेहनत घेतली होती त्या बद्दल सर्वांच मनापासून आभार,संस्थेचे अध्यक्ष श्री संजय महेता व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे तालुका अध्यक्ष यानी मानले.
असे लोकोपयोगी कार्यक्रम ते वारंवार राबवित आहेत व गरजवंत लोकांची सर्वतोपरी मदत करीत आहेत.
यावेळी मिरा-भाईंदर मनसे जिल्हाध्यक्ष श्री. संदिप राणे साहेब, मनसे महिला उपाध्यक्षा महाराष्ट्र राज्य श्रीमती सो.रेश्मा तपासे मॅडम ,माजी उपमहापौर मिरा-भाईंदर महानगरपालिका मा. श्री. हसमुख गेहलोत साहेब , क्राईम पेट्रोल अभिनेता श्री. दिनेश रिकामे साहेब, शिवा मालिका सहायक दिग्दर्शक श्री. रमेश गायकवाड साहेब आणि राईस वाईस फायनान्सचे महिन्यात गुजरात हेड श्री. हिराचंद रेड्डी साहेब यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com