भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर अवैध गावठी बनावटीचा कट्टा बाळगणा-या आरोपीस केले जेरबंद

पुणे
सह संपादक -रणजित मस्के

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम पु. साळगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली दि.२६/०५/२०२५ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार हे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार मंगेश पवार, महेश बारवकर यांना गोपनीय बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, लेकटाऊन, महावीर चौक येथे एक इसम गावठी बनावटीचा कट्टा घेवुन थांबला आहे.
सदरची माहिती प्राप्त होताच नमुद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी लेकटाऊन, महावीर चौक या ठिकाणी जावुन शोध घेतला असता सदर ठिकाणी आरोपी नामे अजय दत्तात्रय गायकवाड, वय २४ वर्षे, रा. ५७० आंबेडकरनगर, कुमावत गिरणीजवळ, गल्ली नंबर १८, मार्केटयार्ड, पुणे हा त्याचे ताब्यात ५०,०००/- रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीच्या कट्टयासहीत मिळुन आला. त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २५८/२०२५, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम पु. साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राहुलकुमार खिलारे, व तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, मितेश चोर मोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.