भारती विद्यापीठ पोलीसानी११ गुन्हयातील जप्त केलेले १५ लाख रु.चे २० तोळे सोन्याचे दागिने नागरीकांना केले परत..

सह संपादक- रणजित मस्के
पुणे :
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे जबरी चोरी, घरफोडी चोरी व इतर चोरीचे एकुण ११ गुन्हयातील विविध स्वरुपाचे सोन्याचे दागिने आरोपींकडुन १५ लाख रुपयांचे २०० ग्रॅम (२० तोळे) वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते. सदरचे दागिने हे आज दिनांक १७/०३/२०२५ रोजी मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे व वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर यांचे हस्ते नमुद गुन्हयातील ११ फिर्यादी यांना परत करण्यात आले आहे. सदर कामगिरीमुळे नागरिकांनी पोलीसांचे कौतुक केले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. अमितेश कुमार मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा मा. अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्री प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील मा. पोलीस उप आयुक्त, पुणे शहर, विशेष शाखा पुणे श्री. मिलिंद मोहीते, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम पु. साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार उमाकात ढोले, यास्मीन मणेर, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, सागर बोरगे, बंडु सुतार यांनी केली आहे.