भारती विद्यापीठ पोलीसानी एका महिलेच्या खुनाचा गुन्हा उघडकीस करून आरोपी शाहरुख मनसुर यांस केले जेरबंद

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

पुणे

दिनांक २०/०५/२०२५ रोजी शहीद कर्नल पाटील पेट्रोल पंप ते म्हशीचा गोठा या दरम्यानच्या सव्हीस रोडवर, धबाडी, आंबेगाव बु, पुणे येथे एका महीलेच्या डोक्यामध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन धारधार हत्याराने वार करुन, तिस गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले आहे म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २६२/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे मा. वरीष्ठांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून गुन्हयातील आरोपीचा तात्काळ शोध घेवुन त्यास अटक करणेबाबतच्या सुचना दिल्या होत्या. मा. वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी मयत महीलेच्या मोबाईल नंबरवरुन तिचे मुव्हर्मेन्टवरुन कोल्हेवाडी ते नवले पुलापर्यंचे सुमारे १०० आस्थापनांचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले त्यामध्ये मयत महीला ही दुचाकी गाडीवर बसुन नवले पुलावर आल्याचे समजले. नवले पुलाचे जवळील आस्थापनांचे सुमारे ७० सी.सी.टी.व्ही कॅमेरे चेक करीत असताना त्या भागात दिनांक २०/०५/२०२५ रोजी भरपुर पाऊस पडत असल्याने व सार्वजनिक रोडवरील लाईट अपुरी असल्यामुळे असंख्य अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे तेथील रोडलगत असलेल्या खाजगी आस्थापनामध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांची पाहणी करीत असताना तेथे विज चमकल्यामुळे झालेल्या प्रकाशात मयत महीला एका रिक्षामध्ये बसताना दिसुन आली आहे. सदर रिक्षाचे वर्णनाची पाहणी केली असता ती रिक्षा टी.व्ही.एस कंपनीची व तिचे मागील बाजुचे हुड पुर्णता काळ्या रंगाचे असल्याचे समजले. त्या रिक्षाचा शोध होणेकरता पुणे आरटीओ कडुन टी. व्ही.एस कंपनीच्या पुणे शहरामध्ये रजिस्टर असलेल्या १०,७९४ रिक्षांची माहीती प्राप्त करुन त्या रिक्षांपैकी १२०० रिक्षांची वाहतुक विभागाकडुन झालेल्या दंडात्मक कारवाईचे चलनावरुन रिक्षाचे पुढील व मागील फोटो प्राप्त केले. तरी खात्री करण्याकरता नमुद रिक्षाचा नवले पुलाकडुन कात्रजकडे जाणाऱ्या हायवेवर आस्थापनांमधील १५० सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे रिक्षाचा शोध घेवुन त्यामध्ये रिक्षा व आरोपी नामे शाहरुख शकील मन्सुर, वय २७ वर्षे, रा. मुळ गाव अमखेरा, शहाजपुर, दमपुर, विजनोर, उत्तरप्रदेश २४६७६१ सध्या रा.लेन नंबर १६ ए, सव्यदनगर, इनामदार स्कुलजवळ, हडपसर, पुणे याने मयत महीलेचा खुन केल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरी, चोरी असे एकूण ५ गुन्हे कोंढवा, हडपसर पोलीस ठाणेस दाखल आहेत. कोंढवा पोलीस ठाणे येथे १) गुरनं ११९३/२०२२, भा.द.वि. कलम ३९२, ३४ व २) १७०/२०२३, भा.द.वि. कलम ३९२, ३४१,३२३.३४ व हडपसर पोलीस ठाणे येथे ३) गुरनं ३६९/२०१६, भा.द.वि. कलम ३७९, ४) गुरनं ३४८/२०१६, भा.द.वि. कलम ३७९, ३४५) गुरनं ४४८/२०१५, भा.द.वि. कलम ३७९,३४ प्रमाणे दाखल आहेत

मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व तपास पथकातील अंमलदार यांनी पुणे ते अमखेरा, शहाजपुर, धामपुर, बिजनोर, उत्तरप्रदेश असे एकुण ३२०० किमी अंतरावर जावुन आरोपी शाहरुख शकील मन्सुर याचा शोध घेवुन त्यास दिनांक ०९/०६/२०२५ रोजी धामपुर पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २. पुणे शहर श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम पु. साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार राहुल शेडगे, नागेश पिसाळ, नरेंद्र महांगरे, महेश बावकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, तुकाराम सुतार, संदीप आगळे, सागर बोरगे, मितेश चोरमोले, किरण साबळे, निलेश खैरमोडे, व आंबेगाव पोलीस स्टेशनकडील धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट