भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर यानी यामाहा कंपनीची दुचाकी गाडी सराईत आरोपीकडुन केली जप्त

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पुणे

दि.१६/०४/२०२५ रोजी कात्रज चौकातील उसाचा रस विक्रीच्या दुकानाचे समोरील बाजुचे रोडवर फिर्यादी यांनी यामाहा कंपनीची मोटारसायकल ही लॉक करुन पार्क केली असता ती कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने चोरी केली आहे म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर २१५/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम पु. साळगांवकर यांनी तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार यांना वाहन चोराचा शोध घेणेबाबतच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार हे वर नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना त्यांना सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी नामे मिथुन सुगंध लोखंडे, वय २२ वर्षे, रा. स.नं १०३५ विनायक हॉटेल मागे, महात्मा गांधी सोसायटी, सहकारनगर भाग ०१, सहकारनगर पोलीस स्टेशन बाजुला, पुणे याने केल्याचे निष्पन्न झाले असुन त्याचेकडुन गुन्हयातील चोरीस गेली यामाहा दुचाकी ही जप्त करण्यात आली असुन आरोपीवर पुढील कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप-आयुक्त परि २, पुणे शहर श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम पु.साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राहुलकुमार खिलारे, पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट