भारती विद्यापीठ पोलीस ठाणे पुणे शहर यांनी चामुंडामाता मंदीरातील दागिने चोरी झालेली घरफोडी नवरात्रौत्सवात केली उघड…

0
Spread the love

उपसंपादक = रणजित मस्के

पुणे :-

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हददीत भिलारवाडी कात्रज घाटातील वळणाजवळ चामुंडाभवानी माता मंदीर असून सदर मंदीरामध्ये दिनांक २२/०८/२०२३ रोजी २१/०० वा ते २३/०८/२०२३ रोजी सकाळी ०६/०० वा चे दरम्यान आरोपीने ०२,६०,०००/- रु किमंतीच्या देवीच्या दागिन्याची चोरी केली होती त्यांनतर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे रोशन ऋषीराज दाहाल वय-३३ वर्षे, धंदा-पुजारी रा. चामुंडा भवानीमाता मंदीराचे मागे, राज टावर. सी-विंग, भिलारेवाडी, भारत पेट्रोलपंपासमोर, कात्रज पुणे यांनी दिल्या फिर्यादीवरुन ५३९/२०२३. भादंवि कलम ४५४, ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाच्या तपासामध्ये भारती विद्यापीठ गुन्हे शोध
पथकाने मंदीरातील सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली असता सदर आरोपी घटनेच्य दिवशी रात्री तोंडास कपड़ा गुंडाळून मंदीराचे दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करताना आढळला त्याने मंदीरामध्ये प्रवेश केल्या केल्या देवीला झोपून सांष्टांग दंडवत घालून सदर मंदीरातील देवीच्या दागिन्याची चोरी करुन साथीदारासह (गोपनीय ) पसार झाला त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकातील महेश बारावकर, निलेश ढमढेरे, चेतन गोरे यांनी आरोपीच्या मंदीरातील हालचाली व सी सी टी व्ही फुटेज तसेच गुप्त बातमीदार, तांत्रीक विश्लेषनाच्या मदतीने आरोपी नामे सुनिल आण्णा कांबळे, वय ३६ वर्षे, धंदा मंडप बांधणे, रा. रामनगर, बापुजी बुवा चौक, पिठाच्या गिरणीजवळ, बारजे, पुणे यास अटक केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली असून सदर गुन्हा त्याने त्याचा साथीदाराचे मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले असून आरोपीकडून देवींचे चोरीस गेलेले एक चांदीचा कासव, चांदीचे पादुका, चांदीची घंटी एक चांदीची चामुंडा माताची मोठी व लहान टाग, चांदीचे नारळाचे तोरण, पिवळया धातुचे दागिने, पांढ-या धातुची कृत्रिम छत्री असे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत .

सदर अटक आरोपी याची गुन्हेगारी पार्श्वभूमअसे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत सदर अटक आरोपी याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याचेवर ५० पेक्षा अधिक घर फोडी व चोरीचे तसेच डबल मर्डरचा गुन्हा दाखल असून सदर मर्डरच्या गुन्हयामध्ये सन २०१८ पासून जेलमध्ये होता आता तो मार्च २०२३ मध्ये जामीनावर बाहेर आला आहे तरी प्रमुख गुन्हयांची माहीती खालील प्रमाणे आहेत.

घोडगांव पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर / २०१८ भादवि कलम ३०२,३४ हिंजवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३१३/२०१४, भादंवि कलम ३७९.३४

हिंजवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३२२/२०१४, भादंवि कलम ३७९, ३४ | हिंजवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २२०/२०१४, भादंवि कलम ३७९,३४

हिंजवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३८४/२०१४, भादंवि कलम ३७९.३४

दत्तवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३१२/२०१४, भादंवि कलम ३७९, ३४

सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३३९ / २०१६ भादंवि कलम ३७९ कोथरुड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३४९/२००३ भादंवि कलम ४५४,४५७,३८०

निगडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २१५/२००३. भादंवि कलम ४५७,३८० निगडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २०५/२००३, भादंवि कलम ४५४,४५७,३८० १०

पिंपरी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १९७ / २००३, भादंवि कलम ४५७,३८०

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट