चारीत्र्याच्या संशयावरुन पत्नीचा चाकुने खून करणाऱ्या पतीला व खून करण्यात प्रवृत्त करणाऱ्या आरोपीच्या भारती विद्यापीठ पोलीसांनी आवळल्या मुसक्या..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :-दिनांक १५/०६/२०२४ रोजी बालाजीनगर, अश्वीनी लॉज येथे रुम नंबर ४०५ मध्ये महीला नामे काजल कृष्णा कदम हिस तिचा पती कृष्णा अंबादास कदम, वय २५ वर्षे, रा. सध्या नंबर ८, गल्ली नंचर ०३, तळजाई पटार, पुणे याने चाकुने गळ्यावर वार करुन तिस जिवे ठार मारले महणुन महीला नामे श्रीमती संगीता आकाश सकट, वय ५ वर्षे, रा.संन ८, गल्ली नंबर ३, तळजाई पठार, पुणे यांनी दिले तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४९९/२०२४, भादंवि कलम ३०२, अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयामध्ये आरोपी कृष्णा अंबादास कदम, वय २५ वर्षे, रा. सध्या नंबर ८, गल्ली नंबर ०३, तळजाई पटार, पुणे यास एक तासात अटक केली आहे.

नमुद गुन्हयाचे तपासामध्ये तपास करीत असताना आरोपी कृष्णा अंबादास कदम यास त्याची पत्नी काजल कृष्णा कदम हिस जिवे ठार मारण्यासाठी आरोपी महेश अभिमान जोगदंड, वय २१ वर्षे, रा. गल्ली नंबर ४८, लोणकर शाळेमागे, तळजाई वसाहत, पदमावती, पुणे याने चिथावणी दिल्याची बाब निष्पन्न करुन त्यास लागलीच गुन्हयात अटक केलेली असुन त्या दोघांना दिनांक २०/०६/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे. पुढील तपास सपोनि शेंडे हे मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली करीत आहे.

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा.प्रविण पवार साो, सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील सो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील सारे मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. नंदीनी वग्याणी सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डी.एस.पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, समीर शेंडे, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, व पोलीस अंमलदार यांनी केली आहे

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट