भरकटलेल्या मनोरुग्णाला परत कुटुंबात स्वाधीन करणाऱ्या खाकी देवदुताला सलाम..

रावेर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले देवमाणूस अंमलदार पोलीस काॅ. श्री. निलेश लोहार यांच्यावर कर्तुत्वाचा सतत वर्षाव
जळगाव: रावेर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या अंमलदार पोलीस काॅ.श्री.निलेश लोहार यांनी जणु पोलीस खात्यात रुजु झाल्यापासून देवदूत म्हणून काम करण्याचा सपाटाच लावला आहे.

मागील लाॅकडाऊन मधे त्यानी एका दाम्पत्याला चालत मध्य प्रदेश येथे आपल्या गावी जाण्यासाठी सुरतहुन रावेरला दाखल झालेल्या व हातावर एका 35 दिवसाच्या तान्हा बाळाला घेऊन ऐकुन 1200 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्यांची हिंमत पाहुन त्या परिवाराला जेवणाची व्यवस्था , कपडे ,चपला व पुढील प्रवासासाठी 2000 /- रुपये दिले होते.
त्यानंतर 7 जुलै 2021 रोजी रावेर स्थानकावर भुसावळ येथील घरातून कौटुंबिक वादातून घरुन रागाच्या भरात पळुन आलेल्या अल्पवयीन मुलांना धिर देवुन त्याच्या पालकांच्या स्वाधीन या दोन्ही निलेश लोहार व त्याच्या पत्नीने केले होते.
त्यानंतर दिनांक 13 सप्टेंबर 2021 रोजी पोलीस काॅ. निलेश लोहार यांनी रावेर तालुक्यातील पिंप्री येथील प्रकृती चिंताजनक असलेल्या एका 12 दिवसाच्या चिमुकलीला तात्काळ आपल्या स्वतःच्या गाडीत बसवून दवाखान्यात दाखल करुन त्या चिमुकलीचे जीव वाचवले होते.

आता त्यानी मनोविकारात भरकटलेल्या एका झारखंड राज्यातील सध्या मुंबई मध्ये राहणारा अशोक शंकर ठाकूर हा 36 वर्षीय युवक मनोरुग्ण औषधांअभावी 1महिणापासून भरकटत भरकटत जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील अहीरवाडी गावी परिसरात आला असता त्यावेळी पोलीस कर्तव्य करीत करीत नेहमी सामाजिक बांधिलकी जपणारे पोलीस अंमलदार श्री. निलेश लोहार यांची नजर त्याच्यावर गेल्याने त्यांनी त्यास आपुलकीने जवळ घेऊन विचारपूस केली. नंतर त्यांनी त्याचे नातेवाईक यांना संपर्क करण्यासाठी त्याच्या पँट च्या पॉकेट मधून काही एक माहिती मिळाली नाही तसेच त्याकडे बंद स्थितीत असलेल्या मोबाईल चार्जिंग करून चालू केला त्याचे मोबाईलमध्ये कोणत्याही व्यक्तींचे संपर्क क्रमांक नसताना मेसेज बॉक्स मध्ये एका अनोळखी नंबरचा मिस कॉल मेसेज प्राप्त झाल्याचे पाहिले. तोच मेसेज हा त्या तरुणाच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा धागा ठरला. त्यावेळी देवदूत पोलीस निलेश लोहार यांनी त्या नंबरवर संपर्क करून अशोक शंकर ठाकूर याची माहिती दिली.
त्यानंतर झारखंड ते रावेर हे अंतर 1600 किमी असल्याने त्यांचे नातेवाईकांना येण्यास 2 दिवस लागणार असल्याने निलेश लोहार यांनी दोन दिवस त्याचा जबाबदारीपूर्वक सांभाळ केला. दोन दिवसांनी अशोक याचे पुतणे उमेश आणि इतर नातेवाईक आल्यावर अशोक ला पाहून त्यांना गहिवरून आले. पोलीस निलेश लोहार यांनी काकांना सुखरूप ठेऊन पुतण्याच्या ताब्यात दिल्यावर सर्व नातेवाईकांनी त्यांचे मनापासून आभार मानले. पोलीस निलेश लोहार यांच्या संवेदनशील कामगिरीस सुरक्षा पोलीस टाइम्स तर्फे मनापासून सलाम व पुढील कर्तव्यास शुभेच्छा…..
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com