भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमीत्त8 ते 14 एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन..

0
WhatsApp Image 2025-04-08 at 10.01.29 PM (1)
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पालघर,

दि.8:- अनुसूचीत जाती, अनुसूचीत जनजाती व वंचित दुर्बल घटकांतील व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडुन विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी याउद्देशाने दरवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमीत्त दि. 8 एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत पालघर जिल्हयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानिमीत्त खालीलप्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाभरामध्ये करण्यात येणार आहे.

भारतीय संविधनाबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी म्हणून प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये संविधानाच्या उद्देशीकेचे (preamble) वाचन करण्यात येईल, प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारीत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा, इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे,प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये संविधान जागर-भारतीय संविधाना विषयी सर्वसाधारण माहिती देणे जसे की, संविधान निर्मीती समिती, अनुच्छेद, विशेषतः मुलभुत अधिकार व मुलभूत कर्तव्ये याविषयी व्याख्यान आयोजित करणे, जिल्हा व विभाग स्तरावरील कार्यालयाच्या वतीने लाभ दिलेल्या लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वारुपात लाभ देण्यात येणार आहे, तसेच दिनांक 11 एप्रिल, 2025 रोजी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती कार्यालयामध्ये साजरी करणे, प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने रक्तदान शिबीरे आयोजित करणे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, पालघर कार्यालयामध्ये महिला मेळावा आयोजित करणे, दि.14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी रॅलीचे आयोजन करणे. अशा प्रमाणे समाज कल्याण, विभागा मार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह हा कार्यक्रम जिल्हाभरात साजरा करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे अवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, पालघर पांडुरंग वाबळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट