भरचौकात वाढदिवस साजरा करणाऱ्या इचलकरंजीतील जर्मनी गँगवर कोल्हापूर पोलीसाची कारवाई..

सह संपादक- रणजित मस्के
कोल्हापूर :-इचलकरंजी मधील जर्मनी गॅंग यांनी भरचौकात वाढदिवस साजरा केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी इचलकरंजी येथील जर्मनी गॅंगवर कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलीस ठाणे यांना सूचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने इचलकरंजी येथील जर्मनी गॅंगचे सदस्य यांना स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर येथे आणून चांगलीच समज देण्यात आली. त्याचप्रमाणे जर्मनी गॅंग यांनी ज्या ठिकाणी केक कापला होता त्या ठिकाणी त्यांना नेऊन त्यांच्याकडून पुन्हा असे कृत्य होणार नाही याबाबत त्यांना समज देण्यात आली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com