भंडारा पोलीसांची गुन्हेगारीवर विशेष वचक…

उपसंपादक – रणजित मस्के
भंडारा :-भंडारा जिल्हा पोलिस अधिक्षक लेोहित मत्तानी यांनी भंडारा जिल्हा पोलीस दलाचा कार्यभार स्विकारल्यापासून गुन्हेगारांवर कारवाई करुन त्यांच्यावर वचक निर्माण केलेली आहे.
खून सदरातील मागील पाच वर्षाचा अभिलेख पाहता कोचीड काळातीत्त सन २०१९ मध्ये- २५ गुन्हे, सन २०२० मध्ये १९ गुन्हे व कोवीड काळानंतर २०२१ मध्ये २० गुन्हे व २०२२ मध्ये-३४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे. सन २०२३ चालू वर्षात खून सदरात एकूण २५ गुन्हे नोंद करण्यात आले आहे. रस्ते अपघातामध्ये २०२२ मध्ये १८२ गुन्ह्यांची नोंद असून अपघातावर आळा बसविण्याकरीता ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह या सदरात सन २०२२ मध्ये एकूण १०२ गुन्हे तर सन २०२३ चालू वर्षामध्ये एकूण ७८६ गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. सध्या सन २०२३ चालू वर्षात १४३ अपघाताची नोंद करण्यात आलेली आहे.
सन २०२२ माप्ये घरफोडीचे एकूण १०८ गुन्ह्यांची नोंद असून त्यापैकी ३६ हुन्हे उघडकीस जगण्यात आले जाते. तसेन २०२३ चालू वर्षामध्ये १०७ गुन्ह्यांची नोंद असून त्यापैकी ४८ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आले आहे. महिला संबंधात सन २०२२ मध्ये एकूण २८३ गुन्हे नोंद करण्यात आलेले असल्याने सन २०२३ चालू वर्षात जिल्ह्यातील महिला भरोसा सेल मंडारा यांचेकडून जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयात महिला जनजागृती विषयी २९ कार्यक्रम तसेच जिल्हा पोलीस ठाणे अंतर्गत
१८५ कार्यक्रम घेण्यात आले असून चालू दांत महिला संबंधात एकूण १७० गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे, अवैध पंचांवर जाळा बसविण्याचेदृष्टीकोनातून अवैध दारु विक्री व गाळणान्या लोकांची माहिती काढून सन २०२२ मध्ये एकूण १४३१ गुन्ह्यांची नोंद करून एकूण १६,११,२६५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असून सन २०२३ एकूण १६५३ गुन्हे नोंद करण्यात आलेली असून एकूण १,२७,२४,५५२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

अवैध जुनार, सट्टा या सदरात कारवाई करून सन २०२२ मध्ये एकूण ३०० गुन्ह्याची नोंद करुन एकूण १८,६२.६९५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात जाला असून सन २०२३चालू वर्षात एकूण ४१६ गुन्ह्यांची नोंद करुन एकूण ३६,०४,७९१ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. एन.डी.पी.एस. सदरात सन २०२२ मध्ये १५ गुन्हे नोंद करण्यात आले असून सन २०१३ चालू वर्षात एकूण ३१ गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे. गुन्हेगारांवर आळा बसावा म्हणून मपोका कलम ५५,५६,५७ अंतर्गत सन २०२३ मध्ये एकूण ३३ लोकांवर कारवाई करुन जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असून मोक्का अंतर्गत १२ व्यक्तींवर कारवाई करुन ०१ गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. एम.पी.डी.ए. अंतर्गत ०३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यांतर्गत वेळोवेळी कोडीग ऑपरेशन, पायी पेट्रोलिंग राबवून उपरोक्त प्रमाणे कारवाई करुन गुन्ह्यांवर प्रतिबंध करण्यात येत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com