“सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ पुरस्कार – 2023” सन्मान सोहळा केशोरी पोलीस स्टेशन येथे मोठ्या उत्साहात झाला संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :

🪷 पोलीस स्टेशन केशोरीने केलेल्या आव्हानाला साथ देत हद्दीतील 24 गावांनी एक गाव एक गणपती या संकल्पने प्रमाणे गणेश मूर्तीची स्थापना करून दिलेल्या वेळेत व शांततेत गणेशोत्सव साजरा केला.
⏩ ज्या गणेशोत्सव मंडळांनी केशोरी पोलीस स्टेशनने दिलेल्या निकषांची पुर्तता केलेली आहे त्या मंडळांना "सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ पुरस्कार - 2023"---- दिनांक 06-10-2023 रोजी मा. श्री.निखील पिंगळे,पोलीस अधिक्षक गोंदिया, यांचे शुभहस्ते पोलीस स्टेशन केशोरी येथे देण्यात आले.
🔸 सदर कार्यक्रमाला अर्जुनी मोरगावचे आमदार मा. श्री.मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा.श्री. यशवंत गणवीर, मा. श्री. अशोक बनकर, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी,देवरी व ईतर मान्यवर व्यक्ती उपस्थीत होते.
🔹 विजेते गणेशोत्सव मंडळ (सर्वसाधारण गट)⏩



1) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, केशोरी
2) बालगोपाल गणेशोत्सव मंडळ, प्रतापगड
3) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बोंडगाव/सूरबन
4) छत्रपती शिवाजी युवाशक्ती गणेशोत्सव मंडळ, चिचोली/जुनी
5) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दिनकर नगर
🔹 विजेते गणेशोत्सव मंडळ (अतिदुर्गम गट)⏩
1) सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळ, भरनोली
2) नवयुवक गणेशोत्सव मंडळ, कन्हाळगाव
3) नवयुवक बाल गणेशोत्सव मंडळ, गंधारी
4) नवयुवक बाल गणेशोत्सव मंडळ, जांभळी
5) श्री सिद्धिविनायक बाल गणेशोत्सव मंडळ, अंभोरा




🔸या कार्यक्रमामध्ये केशोरी पोलीस स्टेशन गणेशोत्सव मंडळाने घेतलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना देखील मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. तसेच या वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अंमलदारांचा देखील सत्कार करण्यात आला.
🔸या कार्यक्रमाची प्रस्तावना ठाणेदार सोमनाथ कदम, सूत्रसंचालन अनिल लाडे सर, आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड यांनी केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com