पोस्को महाराष्ट्र स्टील तर्फे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रम, लाभारर्थी संख्येची शंभरी कडे वाटचाल…

प्रतिनिधी सचिन पवार
माणगांव रायगड :- माणगांव :-पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी आपल्या सी.एस.आर. उपक्रमांतर्गत समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या हितासाठी काम करत आहे. या उपक्रमातील एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ज्याअंतर्गत भागाड ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत जन्मलेल्या मुलींसाठी पोस्को महाराष्ट्र स्टील कडून ५०,००० रुपये मुदत ठेव स्वरूपात जमा केले जातात. १८ वर्षे पूर्ण झाल्यावर या ठेवींची मुदत पूर्ण होते, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी आणि भविष्याच्या सुरक्षेसाठी एक ठोस आर्थिक आधार प्राप्त होतो.

२०१७ पासून सुरू झालेल्या या उपक्रमाचा लाभ आतापर्यंत एकूण ९५ मुलींना मिळाला आहे. २०२३ मध्ये जन्मलेल्या ८ मुलींना पोस्को महाराष्ट्र स्टील तर्फे सप्टेंबर महिन्यात भागाड ग्रामपंचायत कार्यालयात मुदत ठेवींच्या मूळ प्रती वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांच्या स्वागताने झाली, कंपनीच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा सहभागाने कार्यक्रमाचा गौरव वाढविला.
पोस्को महाराष्ट्र स्टीलचे उपव्यवस्थापकीय संचालक श्री. इन क्यो बे यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांसोबत संवाद साधला. श्री. बे यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले आणि या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि आर्थिक सुरक्षेसाठी पोस्को महाराष्ट्र स्टील कडून मिळणाऱ्या योगदानाबद्दल विचार मांडले. त्यांनी मुलींच्या शिक्षणाचा आणि सबलीकरणाचा समाजाच्या एकूण प्रगतीवर होणारा परिणाम विषद केला, तसेच पोस्को महाराष्ट्र स्टील यापुढेही विविध सी.एस.आर. उपक्रमांच्या माध्यमातून समाजाच्या कल्याणासाठी कार्यरत राहील, असं आश्वासन दिलं.
ग्रामसेवक श्री.नरेंद्र घाडगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. बोलताना त्यांनी पोस्को कंपनीने केलेल्या सर्व उपक्रमांचे कौतुक केले, ते म्हणाले, “आता आपण ज्या वास्तू मध्ये बसलो आहोत ती वास्तू देखील पोस्को च्या सहकार्यामुळे उभी आहे, शिवाय इथल्या विद्यार्थ्यांसाठी बसची सोय केली त्यामुळे त्यांना शाळेत येणे जाणे सोयीचे झाले आहे.” अशा अनेक उपक्रमातून पोस्को कंपनी आम्हाला मदत करत असते त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मुलींच्या कुटुंबीयांनी कंपनीचे आभार मानले आणि या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या मुलींच्या भविष्याला मिळालेल्या सुरक्षेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मुलींच्या पालकांनी, या आर्थिक मदतीमुळे त्यांच्या मुलींचे शिक्षण आणि विकासाची दिशा अधिक दृढ झाली असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचा समारोप पसायदान च्या पवित्र पठणाने करण्यात आला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com