प्रेयसीचे मुंडके धडा वेगळे करुन पुलाखाली फेकणारा धुळे जिल्ह्यातील आरोपीच्या पालघर पोलीसानी कशा आवळल्या मुसक्या पहा..!

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर :-मोखाडा पोलीस ठाणे येथे दाखल खुणाच्या गुन्ह्यात कोणतेही धागेदोरे नसताना उकल करण्यात पालघर पोलिसांना मोठे यश.

दि.०७/०२/२०२४ रोज १०.२० वाजताचे पूर्वी नक्की वेळ माहित नाही मोखाडा पोलीस ठाणे हद्दीतील कारेगाव चे शिवारात खोडाळा ते कसारा जाणारे रोडवरील वैतरणा नदीवरील पुलाखाली अनोळखी स्त्री वय ३० ते ३५ वर्षे हीच अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून तिचे मुंडके कोणत्यातरी धारदार शस्त्राने धडा वेगळे करून ते पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने पुलावरून खाली टाकून जीवे ठार मारले म्हणून मुखडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं.२२/२०४ भा.दं.वि.सं. कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचे गंभीर्य लक्षात घेऊन श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाट,अप्पर पोलीस अधीक्षक, पालघर यांनी श्री. गणपत पिंपळे, उपविभागीय पोलीस, अधिकारी, जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अनिल विभुते,स्थानिक गुन्हे शाखा पालघर व श्री. प्रदीप गीते प्रभारी अधिकारी, मोखाडा पोलीस ठाणे यांना वेगवेगळी तपास पथके तयार करून तपासाबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या. त्या अनुषंगाने पोउपनि/ स्वप्निल सावंतदेसाई व पोउपनि/ रवींद्र वानखडे यांचे पोलीस पथक तयार केले. सदर पथकाने मयत महिलेची ओळख पटवण्यासाठी नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, ठाणे, कल्याण, मुंबई तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क केला.

परंतु मयत महिलेची कोणतीही माहिती प्राप्त झाली नव्हती. मयत महिला हिचे उजव्या हातावर ममता असे नाव गोंदलेले होते तसेच पायामध्ये चांदीचे जोडवे त्यावर एस डी एस असा मार्क होता. मयत महिलेच्या पायातील जोडव्याआधारे माहिती प्राप्त केली असता सदरचे जोडवे हे शिरपूर जिल्हा धुळे येथील एस डी एस ( सुधाकर दीपचंद सोनार ) दीक्षा ज्वेलर्सचे मालक यांच्याकडे तयार केल्याचे व ते पावरा समाजाचे महिला वापरत असल्याचे निष्पन्न झाल्याने शिरपूर तालुक्यातील मतदार यादी तपासली असता सुमारे ४४५ ममता नाव असलेल्या महिला यांची यादी संकलित केली.

शिरपूर तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांची बैठका घेतल्या सदर बैठकामध्ये त्यांना गुन्ह्यातील हकीकत सांगितली व त्या भागातील पोलीस पाटील यांचे व्हाट्सअप ग्रुप तयार केले व त्यावर गुन्ह्याची शोध पत्रिका पाठवून त्याद्वारे माहिती घेतली असता मयत ही मौजे लाकडे हनुमान ता. शिरपूर. जिल्हा धुळे येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने अधिक माहिती प्राप्त केली असता यातील मयत व आरोपी सुनील उर्फ गोविंद यादव यांचेत प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी क्र.१ सुनील उर्फ गोविंद यादव वय ४५ वर्ष रा. सोलापूर मूळ रा. सोलापूर मूळ रा. खेचा ता. जि. महाराजगंज राज्य उत्तर प्रदेश यास सोलापूर येथून व आरोपी क्र.२ महेश रवींद्र बडगुजर उर्फ विकी वय ३१ वर्षे रा. बोराडी ता. शिरपूर जिल्हा धुळे यास त्याचे राहते ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले.

सदर आरोपी यांच्याकडे कसून चौकशी केली असता सदर मयत महिला आरोपी क्र.१ यास लग्न करण्यास व प्रॉपर्टी नावावर करून देण्यास बळजबरी करत होती. आरोपीत क्र. १ याने आरोपी क्र.२ याच्याशी संगणमत करून मयत हीच लोणावळा येथे फिरावयास जायचे आहे असे सांगून तीस सोबत घेऊन इंडिका गाडीने पालघर जिल्ह्यातील मौजे कारेगाव चे हद्दीत आणून तिचा रुमाराने गळा आवळून जिवे ठार मारून तिचा खून करून तिचे मुंडके धडा वेगळे करून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने वैतरणा नदीवरील पुलाखाली आणून टाकल्याचे आरोपीने कबूल केले आहे.

सदर दोन्ही आरोपी यास ताब्यात घेण्यात आलेले असून गुन्हाचा अधिक तपास हा श्री. गणपत पिंपळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग हे करीत आहेत. सदरची कारवाई ही श्री.बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक,पालघर श्री. पंकज शिरसाट, अप्पर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री गणपत पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अनिल विभुते, स्थानिक गुन्हे शाखा पालघर श्री. प्रदीप गीते, प्रभारी अधिकारी, मोखाडा पोलीस ठाणे, पोउपनि / स्वप्निल सावंतदेसाई, पोउपनि / रवींद्र वानखेडे,पोहवा /राकेश पाटील,पोहवा /१२४० कपिल नेमाडे,पोहवा /२८९ संजय धांगडा,पोहवा /८१५ कैलास पाटील, पोहवा /८८८ दिनेश गायकवाड, पोहवा /६२०नरेंद्र पाटील,सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा. पालघर तसेच पोहवा/विशाल पाटील, पोशि/ वाल्मीक पाटील, पोशि / रोहित तोरस्कर नेमणूक सायबर पोलीस ठाणे, पालघर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट