बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्तोल ताब्यात बाळगुन दहशत माजविणारा रेकॉर्ड वरील गुन्हेगार नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट क. १ च्या जाळ्यात

सह संपादक -रणजित मस्के
नाशिक


मा.श्री. संदिप कर्षिक, पोलीस आयुक्त., नाशिक शहर यांचेकडुन देण्यात आलेल्या सुवंनानुसार मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा.श्री. संदिप मिटके, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवश्त्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या व त्याप्रमाणे मार्गदर्शन केले होते.
दिनांक २५/०७/२०२५ रोजी गुन्हेशाखा युनिट क्रमांक १, नाशिक शहर कडील पो. हवा./३७७प्रशांत मरकड व पोहवा/१८८३ विशाल काठे यांना त्यांचे गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील आरोपी अविनाश वाणी हा देशी बनावटीचे पिस्तोल जवळ बाळगुन दत्त चौक, सिडको, अंबड, नाशिक परीसरातील नागरीकांमध्ये दहशत माजवित फिरत असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली होती. सदरची बातमी पोहवा / ३७७ प्रशांत मरकड व पोलवा /१८८३ विशाल काठे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि/चेतन श्रीवंत, पोहवा / प्रशांत मरकड, विशाल काठे, संदीप भांड, प्रदिप म्हसदे, विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, नाजीमखान पठाण, अमोल कोष्टी, व वालक पोहवा सुकाम पवार अशांनी डॉ. बाबासाहेब आंबडेकर स्टेडियम, दत्तचौक, सिडको, नाशिक येथे सदर इसमास शिताफीने पकडुन ताब्यात घेतले. सदर इसमाचे नाव अविनाश राऊसाहेब वाणी वय ३० वर्षे राहणार- रविवारी पेठ, चांदीच्या गणपतीच्या मागे, रविवार कारंजा, नाशिक असे असल्याचे समजल्यावरून त्यांचेकडुन ३०,०००/-रूपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्तोल, ०१ जिवंत काडतुस ५००/-रूपये किंमतीचे असे हस्तगत करण्यात आले आहे.
सदर आरोपी हा रेकॉर्ड वरील असुन त्यावेविरूध्द दाखल असलेल्या गुन्हयाची माहिती खालील प्रमाणे १) गंगापुर पोलीस ठाणे । गुरनं १८०/२०१६ भा.द.वि. कलम ३९४, ३९७, ३२३, ३४ म.पो. का कलम १३५ प्रमाणे
२) सरकारवाडा पोलीस ठाणे। गुस्नं १३६/२०१६ भा. द. वि कलम ३९९, ४०२ भा.ह.का. कलम ३/२५,
म.पो.का. कलम १३५ प्रमाणे
३) पंचवटी पोलीस ठाणे । गुरनं २५७/२०१६ भा.द.वि कलम ३९५, ३९४, ३४ प्रमाणे
४) पंचवटी पोलीस ठाणे। गुरनं २६३/२०१८, भा.द.वि कलम ३०२, १२० (ब), ३४ भा.ह.का. कलम ३/२५. ५/२५ प्रमाणे
सदरच्ख्या इसमावर अंबड पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास पुढील तपासकामी अंबड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी मा.पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्षिक, मा. पोलीस उप-आयुक्त श्री. किरणकुमार चव्हाण, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री संदिप मिटके, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड, सपोनि/हिरामण भोये, पोउनि/चेतन श्रीवंत, पोहवा/प्रशांत मरकड, विशाल काठे, संदीप भांड, प्रदिप म्हसवे, विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, नाजीमखान पठाण, रोहिदास लिलके, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, मपोअं/अनुजा येलवे, वालक पोहवा सुकाम पवार यांनी केली आहे.