भावाचे पहिले पत्नीचा धारदार शस्त्राने गळा कापून निर्घृण खुन करुन तीचे ५ महीने मुलास पळवुन पसार झालेल्या आरोपीस २३ वर्षानंतर डोबीवली येथुन अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश..

सह संपादक- रणजित मस्के
डोंबिवली ;
तक्रारदार महम्मद फिरोज महम्मद इंद्रीस अन्सारी यांनी त्यांची पहिली पत्नी शवाना परवीन हीचा त्याचा मोठा भाऊ मंहमद तरवेज मंहमद इंद्रीस अन्सारी व दुसरी पत्नी अफरीन वानु यांनी धारदार शस्त्राने गळा कापुन तिस जिवे ठार मारुन त्याचे ५ महीन्याचे मुलास पळवून नेल्याची तकार दिल्याने विरार पो.स्टे. गुनोक्र. ८१/२००२ भादविसक ३०२,३६३,३४ प्रमाणे दिनांक ०६.०६.२००२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
गुन्हयाचे तपासात तक्रारदार महम्मद फिरोज महम्मद इंद्रीस अन्सारी व त्याची मयत पहिली पत्नी शवाना यांचे लग्नास तक्रारदार याचे भावाचा विरोध होता. तरीही तक्रारदार महम्मद फिरोज याने शबाना परवीन हिचेशी लग्न केले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी घरातील लोकांचे आग्रहा खातर आफरीन वानु हीचे सोवत दुसरे लग्न केले होते. घटने पुर्वी तक्रारदार यांची पहिली पत्नी गोवंडी, मुंबई व दुसरी पत्नी विरार येथे राहण्यास होती. दिनांक ०३.०६.२००२ रोजी तक्रारदाराची पहिली पत्नी शवाना परवीन ही तिचा मुलगा महम्मद अफरोज वय-५ महीने यांचेसह अफरीन वानु राहत असलेल्या परमात्मा पार्क विल्डींग, चंदनसार रोड, विरार पूर्व येथे आली असता त्याचा मनात राग धरुन तक्रारदार याचा मोठा भाऊ आरोपी नामे मंहमद तरवेज मंहमद इंद्रीस अन्सारी व आफरीन वानु यांनी धारदार शस्त्राने शवाना परविन हीचा गळा कापुन निघुन खुन करुन तिचे ५ महीनेचे मुलास पळवुन नेल्याचे निष्पन्न झाले होते. आरोपी मंहमद तरवेज मंहमद इंद्रीस अन्सारी हा घटना घडलेपासुन म्हणजे गेल्या २३ वर्षापासून फरारी होता.
मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) व मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी गंभीर व संवेदनशील गुन्हयातील फरारी/अटक नसलेल्या आरोपीस अटक करणेवावत आदेश केले होते. त्याप्रमाणे मध्यवर्ती गुन्हे प्रकटिकरण कक्षाचे पोलीस पथकाने गुन्हयाची विरार पोलीस ठाणे येथुन माहिती घेवुन सातत्याने पाठपुरावा केला असता, आरोपीचे मुळ गांव चमन होली जि. नांलदा, राज्य विहार येथुन आरोपीत मंहमद तरवेज मंहमद इंवीस अन्सारी हा डोवीवली जि.ठाणे येथे आपले अस्तीत्व लपवुन राहत असल्याची माहीती मिळून आली. मिळालेल्या माहीती प्रमाणे तपास करता आरोपी नामे मंहमद तरवेज मंहमद इंद्रीस अन्सारी, वय-५२ वर्षे हा दि.१७.०३.२०२५ रोजी रुम क्र.०१, ओमसाई चाळ, कोळेगांव, डोंबीवली पूर्व जि.ठाणे येथे मिळून आला. अशा प्रकारे भावाचे पहिले पत्नीचा धारदार शस्त्राने गळा कापुन निघुन खुन करुन तिचे ५ महीने मुलास पळवुन पसार झालेल्या आरोपीस २३ वर्षानंतर डोबीवली येथुन अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश आले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अविनाश अंबुरे व सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.मदन चल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे प्र.पो. निरी/अविराज कुराडे, सपोनिरी. दत्तात्रय सरक, नितीन वेंद्रे, प्रशांत गांगुर्डे, पुष्पराज सुर्वे, सहापोउपनिरी/श्रीमंत जेधे, मनोहर तावरे, आसीफ मुल्ला, पोहचा. शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, धनंजय चौधरी, संदिप शेरमाळे, संतोष मदने, रविंद्र भालेराव, प्रविणराज पवार, हनुमंत सुर्यवंशी, समीर यादव, विकास राजपुत, रविंद्र कांबळे, विजय गायकवाड, पोअं/नितीन राठोड, सफौ. संतोष चव्हाण, मसुव/सचिन चौधरी यांनी यशस्वी कामगिरी केलेली आहे.