गोमांस तस्करास मिरा-भाईंदर पोलीसांनी केले हद्दपार..!

प्रतिनिधी- विजय परमार
मिरारोड :-मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत परिमंडळ-१ अधिनस्त नयानगर, काशिगाव, काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार कासमअली शरीफ कुरेशी, वय-५३ वर्ष, रा. रुमन. ३०१, चंद्रविहार सोसायटी, शितलनगर, हॉटेल गरीब नवाब जवळ, गुरुकृपा हॉस्पीटल बाजुला मिरारोड पु. ता. जि. ठाणे याच्यावर सन २०१६ ते २०२४ या कालावधीत मध्ये नयानगर, काशिगाव, काशिमीरा पोलीस ठाणे तसेच लगतच्या परिसरात गर्दीकरुन अपहरण, जनावरांचे बेकादेशीर गोमांसमांस विक्री असे एकुण ०७ गुन्हे दाखल असुन सदर गुन्हयात त्यास अटक होवूनही त्याचे गुन्हेगारी वृत्तीत बदल होत नसल्याने व सन २०२४ मध्ये दाखल गोमांस विक्रीच्या गुन्हयामुळे मिरारोड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने त्यास श्री. मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय, श्री. दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली श्री. प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांनी त्याचे कार्यालयीन हद्दपार आदेश क्र. १३/२०२४ अन्वये ठाणे, पालघर, बृहन्मुंबई, मुंबई उपनगर, या जिल्हा कार्यक्षेत्रातुन २ वर्षाकरीता हद्दपार केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com