बेकायदेशीर गॅस रिफिलींग करुन विकणाऱ्या विकांत जाधवला काळेपडळ पोलीसानी ठोकल्या बेडया ..

सह संपादक- रणजित मस्के
पुणे ;
छापा टाकुन एकुण १,३०,४३० रु. किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत, काळेपडळ पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी “
पुणे शहरात अवैध व बेकायदेशीर धंदे वाहतुक यांचेवर परिणाम कारक कारवाई करणेबाबत मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर यांनी आदेशीत केले आहे. त्याअनुषंगाने मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी तपास पथक अधिकारी व अंमलदार व सर्व अधिकारी, अंमलदार यांना अवैध व बेकायदेशी धंदे व वाहतुक यावर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
वरिष्ठांनी दिलेले आदेश/सुचनांप्रमाणे दिनांक १८/०३/२०२५ रोजी १३/०० वा. चे सुमारास काळेपडळ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार २०५४ काळभोर, पोलीस अंमलदार ८६४८ अतुल पंघरकर, पोलीस अंमलदार २४३ महादेव शिंदे, पोलीस अंमलदार १००७० सद्दाम तांबोळी असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार अतुल पंधरकर यांना गोपनीय बातमी मिळाली की, माऊली गॅस एजन्सी, रेयान सलुन शेजारी, एआरव्ही सोसायटीचे समोर, हांडेवाडी रोड, हडपसर, पुणे या ठिकाणी एका पत्र्याच्या गाळ्यामध्ये एक इसम हा घरगुती गॅसच्या टाक्यांमधुन छोट्या गॅसच्या टाक्यामध्ये गॅस भरत आहे.
अशी बातमी मिळाल्याने, लागलीच वरील अधिकारी व अंमलदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सापळा रचून सदर ठिकाणी जावुन छापा टाकुन कारवाई केली. सदर छापा कारवाईमध्ये एका इसमास ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव, पत्ता विचारले असता, त्यांनी त्यांचे नाव विकांत राजकुमार जाधव, वय २२ वर्षे, रा. साईबाबा मंदिराजवळ, शोभा स्पर्श अपाटमेंट, फ्लॅट नं. १०२. ससाणे नगर, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले. सदर ठिकाणावरुन ८० गॅस टाक्या वजनकाटा, गॅसट्रान्सफर पाईप असा एकुण १,३०,४३०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही डॉ. श्री. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग, पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर, पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार २०५४ प्रविण काळभोर, पोलीस अंमलदार ८६४८ अतुल पंधरकर, पोलीस अंमलदार २४३ महादेव शिंदे, पोलीस अंमलदार १००७० सद्दाम तांबोळी यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.