बेकायदेशीर शाळेचे मुलांना नेणाऱ्या वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन कल्याण पथकाचे करडी नजर

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय
दि १५ कल्याण ठाणे




कल्याण मधील एका टेम्पो चालकांनी आपल्या टेम्पोमध्ये बेकायदेशीरपणे शाळेचे मुलांना नेत असतानाची व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हायरल व्हिडिओचे अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन कल्याण अधिकारी आशुतोष बारकुल यांनी एक मोहीम पथक तयार केले. या मोहिमेचे पथका मध्ये इंद्रजीत आमते (मोटर वाहन निरीक्षक) निलेश अहिरे प्रसाद खरगे (सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक) यांनी त्या टेम्पो वाहन क्रमांक MH05EX1734 मालवाहतूक वाहन बेकायदेशीर शाळेला मुलांना नेणारे वाहनाला कल्याण आरटीओ मध्ये अटकवून त्याच्यावर १४०००/- दंडात्मक कारवाई करण्यात आले. त्याचबरोबर काही दिवसा अगोदर अंबरनाथ मधील त्या वाहनांवर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात आलीली माहिती उपप्रादेशिक परिवहन कल्याण अधिकारी आशुतोष बारकुल यांनी दिली.