बेकायदेशीर गांजा विक्री करणाया इसमास पकडून 3 किलो 100 ग्रॅम वजनाचा गांजा कोल्हापूर पोलीसांनी केला जप्त

सह संपादक -रणजित मस्के
कोल्हापूर

इतर साहित्य असा एकुण 1,37,700/- रु किंमतीचा मुददेमाल स्था. गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई
मा. पोलीस अधीक्षक, श्री. योगेश कुमार साो यांनी अवैध व्यवसाय, अंमली पदार्थ साठा तसेच विक्री करणारे तसेच अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत.
मा. पोलीस अधीक्षक साो, यांनी दिले आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस पथक तयार करुन रेकॉर्डवरील गुन्हेगाराबाबत माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार शुभम संकपाळ व विशाल चौगले यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीतील शुगरमिल कॉर्नर ते शिये फाटा जाणारे रोडवर श्री मंगल कार्यालयाचे पुढील बाजुस एक मोटर सायकलवरून येवून गांजा विक्री करीत असतो. अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व पोलीस अंमलदारांचे पथक सदर ठिकाणी जाऊन खात्री करून सापळा लावुन दि. 18.07.2025 रोजी छापा टाकला असता आरोपी इसम नामे सचिन शामराव पाटील रा. 1832 ई वॉर्ड शाहुनगर राजारामपुरी कोल्हापूर यास पकडले असता त्याचे ताब्यात गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. सदरबाबत दोन पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया करून त्याचे कब्जातून बेकायदेशिर विक्रीकरिता आणलेला एकूण 3 किलो 100 ग्रॅम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण 1,37,700/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे. आरोपी विरुध्द शाहुपूरी पोलीस ठाणेस एनडीपीएस कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास शाहुपूरी पोलीस ठाणे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. योगेश कुमार साो, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार साो यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, तसेच पोलीस अंमलदार अशोक पोवार, सचिन पाटील, शुभम संकपाळ, विशाल चौगले, लखनसिंह पाटील, विलास किरोळकर, अरविंद पाटील, विजय इंगळे, संदीप बेंद्रे, सागर माने, संजय कुंभार, महेश पाटील, महेश खोत व अमित सर्जे यांनी केली आहे.