सुपारी घेवुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करुन मोबाईल फोन व स्कुटी जबरीने चोरुन नेलेल्या आरोपींना वाडा पोलीसांकडुन अटक..!
उपसंपादक: मंगेश उईके
पालघर. वाडा
दिनांक २०/०७/२०२५ रोजी इसम नामे ऋषीकेश नितीन मनोरे, वय २७ वर्षे, जात हिंदु वाणी, व्यवसाय-पुजा भांडार दुकान, रा. घर नंबर १०६, परिजात अपार्टमेंट, आगरआळी वाडा, ता.वाडा, जि. पालघर हे रात्री ०८:३० वाजताचे सुमारास त्यांचे याडा बाजार पेठेतील दुकान बंद करुन त्यांच्या ज्युपीटर स्कुटीवरुन घरी जात असतांना गणेश मैदान वाडाच्य पाठीमागे असलेले जैन मंदीराजवळ उभे असलेले ३ अनोळखी इसमांनी त्यांना हात दाखवुन थांबवले. त्यापैकी एका इसमाने त्यांचे मोबाईल स्विच ऑफ झाल्याचा बहाणा करुन एक कॉल करायचा आहे. असे सांगुन त्याचा मोबाईल घेवुन फोनवर बोलत असतांना त्या तीन इसमांपैकी एकाने ऋषीकेश मनोरे याच्या डोळयांमध्ये मिरची पुड टाकली तर इतर दोघांनी त्यांचेकडे असलेल्या धारदार शस्राने डोक्यावर, हातावर व पायावर गंभीर दुखापती केल्या. त्यामुळे ऋषीकेश मनोरे हा स्कुटीसह खाली पडला असता त्या तिन इसमांनी त्याची मोटार स्कुटी व मोबाईल फोन जबरीने चोरुन पळून गेले. ऋषीकेश मनोरे यास त्याचे मित्र व नातेवाईक असे वाडा सरकारी दवाखान्यात दवाउपचाराकरीता घेवुन गेले असता तेथे उपचाराची पुरेसी सुविधा असल्याने त्यास पुढील उपचाराकरीता ज्युपीटर हॉस्पीटल ठाणे येथे घेवुन गेले. तेथे त्याच्यावर उपचार सुरु असतांना दिलेल्या जबाबावरुन वाडा पोलीस ठाणे गु.रजि.नं. १ ३०५/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३११,३०७,३ (५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे, सपोनि भगवंत चौधरी, पोउनि मालकर यांच्यासह सफौ. गुरुनाथ गोतारणे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांनी घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतले. गुन्हयाचे घटनास्थळी जखमीचे रक्त मोठया प्रमाणावर पडलेले असल्याने तसेच गुन्हयाचे घटनास्थळी एक मिरची पावडरचे पाकेट पडलेले असल्याने फॉरेन्सीक व्हॅन व अंगुली मुद्रा तज्ञ यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळाची स्थिती पाहुन आवश्यक ते नमुने तपासणी करीता काढुन दिले. सदर गुन्हयाचे घटनास्थळी असलेले साक्षीदारांकडे विचारपुस केली असता ऋषीकेश मनोरे यास मारहाण करणारे तिनही हे त्याच्या ताब्यातील ज्युपीटर मोटार स्कुटीवर बसुन ते वाणी आळीकडे गेले असल्याची माहीती मिळाल्याने वाडा शहरातील सी.सी.टि.व्ही. फुटेज चेक केले असता एका मोटार स्कुटीवरुन तिन इसम जातांना दिसत आहेत. तसेच जखमीचा मोबाईलचे टॉवर लोकेशन पाहीले असता ते वाडा शहरामध्ये असल्याचे दिसत होते. आरोपींनी चोरुन नेलेल्या मोटार स्कुटीचा शोध घेत असतांना सदरची मोटार स्कुटी ही वाडा आशोक वन येथे इमारती खाली सोडल्याची माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन पाहणी केली असता आरोपीत हे अशोक वनच्या वॉल कुंपनाच्या भिंतीवरुन उडी मारुन जातांना दिसले. गुन्हयातील आरोपींनी गुन्हा केल्याचा कोणताही पुरावा मागे ठेवलेला नसल्याने अतिशय मेहनतीने व बारकाईने तांत्रीक माहीतीच्या आधारे सदर आरोपींचा शोध घेत असतांना सदर आरोपीत हे गुन्हा करणेपुर्वी दिनांक १८/०७/२०२५, १९/०७/२०२५ व दिनांक २०/०७/२०२५ रोजी वाडा येथे असल्याचे सी.सी.टि.व्ही. फुटेज वाडा एस.टी. स्टॅन्ड, भाजी मार्केट येथील सी.सी.टि.व्ही. फुटेज तपासले असता तीन संशयीत इसम फिरत असल्याचे दिसत होते. दिनांक १९/०७/२०२५ रोजी वरील आरोपीत हे फिर्यादी यांच्यावर हल्ला करण्याचे तयारीत होते परंतु सदर दिवशी दिवसभर फिर्यादीचे वडील श्री. नितीन मनोरे हे फिर्यादी यांचे सोबत होते त्यामुळे सदर दिवशी फिर्यादीवर त्यांना हल्ला करता आला नाही. दिनांक १९/०७/२०२५ रोजी पुन्हा वाडा बाजार पेठेत सी.सी.टि.व्ही. फुटेजची तपासणी करत असतांना आरोपीत हे रोहीदास नगर येथे बस स्टॅन्ड येथुन जातांना दिसत होते परंतु पुढे ते दिसत नसल्याने रोहीदास नगरच्या सुरुवातीला असलेल्या इंद्रप्रस्थ हया धारमध्ये विचारपुस करुन तेथील सी.सी.टि.व्ही. फुटेज तपासले असता दुपारी १३:०० वाजे पासुन सायंकाळी १९:०० वाजे पर्यंत आरोपीत हे सदर ठिकाणी मद्यपान करतांना दिसले व ते नांदगांव नाशिक येथील असल्याची माहीती प्राप्त झाल्याने नाशिक येथे पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना पाठवुन आरोपींचा शोध घेत असतांना आरोपीत हे त्यांचे मोबाईल काही वेळ बंद ठेवत असल्याने आरोपींचे लोकेशन मिळणेस अडचणी येत होत्या. तरीही पोलीसांनी तांत्रीक माहीतीच्या आधारे आरोपींचा शोथ घेत असतांना इसम नामे १) सुशांत सोमनाथ चिडे, रा. बंगालीबाबा एस.टी. स्टॅन्ड कॉलनी, पळसे, ता.जि.नाशिक, २) तुषार संजय मनवर, रा. बंगालीबाबा एस.टी. स्टॅन्ड कॉलनी, पळसे, ता.जि. नाशिक, ३) यश अजय करंजे, रा. साकोर महादेव मंदिर शेजारी, ता. नांदगांव, जि.नाशिक यांना नाशिक येथुन ताब्यात घेवुन त्यांच्याकडे गुन्हयाचे अनुषांने बारकाईने विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली व सदरचा गुन्हा करणेसाठी त्यांना सी. राधिका मनिष मनोरे, ऊर्फ सी. राधिका अविनाश जाधव सध्या रा. दोस्ती इंम्पेरीया, ठाणे, ता.जि.ठाणे मुळ रा.वाडा वाणी आळी, ता. वाडा, जि. पालघर यांनी १,००,०००/-रुपयाची सुपारी दिल्याचे सांगीतले. सदरची माहीला ही ठाणे येथे राहत असल्याने सदर ठिकाणी पोलीस पथक पाठवुन तिचा शोथ घेत असतांना ती आपला राहणेचा पत्ता व मोबाईल नंबर सतत बदलत असल्याने ती मिळुन येत नाही. सदर गुन्हयात ताब्यात घेतलेले आरोपीत नाशिक येथील सराईत गुन्हेगार असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. तसेच महीला नामे सौ. राधिका मनिष मनोरे, ऊर्फ सौ. राधिका अविनाश जाधव ही फिर्यादीची सख्खी काकी असल्याचे व त्यांच्यात कौटुंबीक अंतर्गत कारणावरुन तिनेच सुपारी दिली आहे. सदर गुन्हयातील ३ आरोपींना अटक केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोउनि राजकुमार मुंढे हे करत आहेत.
सदरची कामगीरी श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. गणपत पिंगळे, उप विभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. दत्तात्रय किंद्रे, पोलीस निरीक्षक, सपोनि भगवंत चौधरी, पोउपनिरी/सागर मालकर, पोउनि राजकुमार मुंढे, सफौ. दयानंद पाटील, सफी. गुरुनाथ गोतारणे, पोशि/गजानन जाधव, पोशि/संतोष वाकचौरे, पोशि/संजिव सुरवसे, मपोशि वाघमारे यांनी केलेली आहे.