सावधान न्यायालयाने बोलावलंय, दुर्लक्ष करू नका”, अन्यथा होईल जेल, गोंदिया जिल्हा पोलीस करतायेत वॉरंट ची बजावणी मोहीम…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

⏩ याबाबत थोडक्यात माहिती अशी की, मा. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय, आमगाव जिल्हा गोदिया यांचे न्यायालयाद्वारें 1) कोर्ट केस क्र. 655/2019 कलम 65 ई 77 अ मदाका मधील मधील आरोपी नामे- सुकलाल भैय्यालाल चौव्हाण वय 66 वर्ष रा. कट्टीपार ता. आमगाव जि. गोंदिया

(2) कोर्ट केस क्र 137/ 2019 कलम 279 भादंवी मधील आरोपी नामे- राहुल गजानन चौधरी वय 32 वर्ष रा. गोसाईटोला ता. आमगाव जि. गोंदिया

3) कोर्ट केस क्र. 120/ 2018 कलम 452,294, 323 भादंवी मधील आरोपी नामे- जावेद खान नबिज खान वय 27 वर्ष रा. बनिया मोहल्ला आमगाव

4) कोर्ट केस क्र. 237/ 2022 कलम 324, 504, 506 भादंवी मधील पाहीजे महीला आरोपी नामे- सौ. रुक्मीनी राजेन्द्र नागपुरे वय 30 वर्ष रा. सेमोदेमो पहाडी आमगाव यांचे वारंवार न्यायालयद्वारें समंन्स काढून न्यायालयात हजर राहण्याकरिता बोलावण्यात आले होते. परंतू नमुद आरोपी हे वारंवार समंन्स चुकवित असल्याने आणि मा. कोर्टाने बजावलेल्या समन्सवर नमुद आरोपी हजर होत नसल्याने मा. कोर्टाने वरील तिन्ही आरोपीतांचे नॉन बेलेबल वॉरन्ट आदेशीत केले होते. नॉन बेलेबल वॉरंन्ट च्या अनुषंगाने वरील आरोपी यांचा शोध घेतले परंतू ते मिळुन येत नव्हते.

   त्यामुळे मा. वरीष्ठांनी नमूद आरोपी यांना मा . न्यायालयाचे आदेशाचे अनुषंगाने नमूद आरोपी यांचेवर नजर ठेवण्यासाठी गोपनिय यंत्रणा सक्रिय करून त्यांना ताब्यात घेवून न्यायालयापुढे हजर करण्या करीता आदेशित करून निर्देश सूचना दिल्या होत्या. 

        या अनुषंगाने मा. वरीष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे आणि मार्गदर्शनात आमगाव पो. स्टॉफ नी दिनांक- 25/09/2023 रोजी सकाळी 05/00 वा. सुमारास प्राप्त गोपनिय माहीतीचे आधारे नमुद आरोपी राहत असलेले ठिकाणी जावून आरोपी क्र.01 ते 03 यांना मा. कोर्टाचा नॉन बेलेबल वॉरंन्ट दाखवून पोलीस स्टेशन आमगाव येथे आणण्यात आले आहे. तसेच वरील आरोपी क्र. 4) यांचेविरुध्द पोलीस स्टेशन आमगाव येथे गुन्हा दाखल दिनांक 15/04/ 2022 पासुन पाहीजे असल्याने त्यांचेविरुध्द मा. कोर्ट आमगाव | येथे कलम 299 सिआरपीसी प्रमाणे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. आरोपी क्र. 4) ही मौजा पाऊलदौना ता. सालेकसा येथील तिच्या माहेरी आल्याचे गुप्त माहीती वरून त्याठिकाणी जावून तिस कोर्ट केस क्र. 237/2022 मध्ये ताब्यात घेतले.

            मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सा. आमगाव यांचे कोर्टात वरील चारही आरोपीतांना | पेश केले असता मा. कोर्टाने आरोपी क्र. 01 ) ते 03 ) यांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली असून त्यांना जिल्हा मध्यवर्ती कारागृह भंडारा येथे पाठविण्यात आले आहे . तर आरोपी क्र. 4) यांना जामिनावर सोडण्यात आले आहे.

        सदरची कामगिरी  पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री.निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक, श्री. अशोक बनकर, सा. गोंदिया कॅम्प देवरी, उपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालय आमगाव श्री. संकेत देवळेकर, श्री. किशोर पर्वते सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.युवराज हांडे, पोशि, रामटेके, अग्निहोत्री, उपराडे, मन्यार, मपोशि. बहेकार, यांनी कामगिरी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट