बतावणी करून नेलेले ८० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत एक आरोपी अटक हडपसर पोलीसांची कारवाई..

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे

महिला फिर्यादी यांना निलकंठ सुर्यवशी रा. खेड, जि. पुणे याने त्यांचे घरावर संकट आले असल्याचे सांगून तुमच्याकडील सोन्याचे दागीने घेवून या अशी बतावणी करुन, विश्वास संपादन करुन सोन्याचे दागीने देण्यास भाग पाडले व त्यानंतर फिर्यादी यांची नजर चुकवुन सोन्याचे दागीने घेवुन गेल्याने हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ३३८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१९ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून मा.श्री. डॉ. राजकुमार शिंदे सो. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-०५, पुणे, यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व मा. संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आणि निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या सुचनांप्रमाणे तपासपथक प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गॅड, व तपास पथक अंमलदार अमित साखरे, अमोल दणके, यांचे पथक काम करीत असताना, प्राप्त सीसीटीव्ही फुटेज व त्याचे केलेले विश्लेषण आधारे आरोपी नामे १) निलकंठ अण्णाराव सुर्ववचशी वय ३५ वर्ष रा. फ्लॅट नंबर ०६ ए विंग, राधा क्लासीक बिल्डींग, आळेफाटा ता. जुन्नर पुणे यास आळेफाटा येथून ताब्यात घेतले. त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींकडून त्याने गुन्ह्यातील फसवणूक करून नेलेले ७९.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यामध्ये सोन्याचा नेकलेस, लक्ष्मीहार, मंगळसुत्र, गंठण, सोन्याची चैन बदाम असलेली असा किं. रु ६,४०,०००/- चा माल हस्तगत केला आहे. तसेच आरोपी याची दिनांक ३१.०३.२०२५ रोजी पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली असून अधिक तपास पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त साो पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त सो. पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री.डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त साो., परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अनुराधा उदमले मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोनि. (गुन्हे), यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव, निलेश किरये, चंद्रकांत रेजितवाड, अजित मदने, अमोल दणके, कुंडलीक केसकर, अमित साखरे, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महाविर लोंढे, महेश चव्हाण, बापु लोणकर, यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट