रिक्षात बसुन आलेल्या महिलेचा विनयभंग करणारा रिक्षाचालक जेरबंद नाशिक गुन्हे शाखा युनिट क्र. १ ची कारवाई..

नाशिक

सह संपादक -रणजित मस्के
दिनांक २२/०६/२०२५ रोजी रात्री ०८:०० वाजेच्या सुमारास फिर्यादी हया सिडको स्टेट बैंक चौक ते मेनरोड नाशिक कडे जात असतांना यशवंत व्यायामशाळेजवळ रिक्षा थांबवुन फिर्यादी हया एका रिक्षामध्ये बसलेल्या असतांना सदर रिक्षाचालकाने फिर्यादी यांचे सोबत अश्लिल कृत्य करून त्यांचा विनयभंग केला म्हणुन फिर्यादी यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केल्याने सरकारवाडा पोलीस ठाणे येथे । गुरनं १८५/२०२५ भा. न्या. सं. कलम ७४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदरचा गुन्हा हा अज्ञात रिक्षाचालकाने केला असल्याने तसेच अतिशय संवेदशिल असल्याने मा. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी सुचना दिल्या होत्या. त्या अनुषगांने मा. श्री. प्रशांत बध्छाव, पोलीस उपायुक्त (गुन्हे), मा. संदिप मिटके, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते.
त्या अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट कमांक १ चे अधिकारी व अंमलदार असे सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ कडील पोहवा /१८८३ विशाल काठे व पोअं/२५४४ मुक्तार शेख यांना गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा नासीर शेख याने केला असुन तो भारतनगर, नाशिक या भागात फिरत असल्याची माहीती मिळाली, सदरची माहीती वपोनि श्री. मधुकर कह सर यांना देवुन त्यांनी गुन्हेशाखा युनिट ०१ चे सपोनि /हिरामण भोये, पोउनि /सुदाम सांगळे, पोहया/विशाल काठे, प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, विशाल देवरे, मिलीदसिंग परदेशी, मुक्लार शेख, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे अशांचे पथक तयार करून त्याचा शोध घेवुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशीत केले. त्या अनुषंगाने नमुद पथकाने सदर पाहीजे आरोपीताचा भारतनगर, नाशिक परिसरात शोध घेतला असता तो दिनांक २४/०६/२०२५ रोजी भारतनगर दर्ज्याजवळ, नाशिक येथे मिळून आल्याने त्यास पकडुन त्यास त्याचे नाव गांव विचारले त्याने त्याचे नाव नासिर खलील शेख, वय-२५ वर्षे, रा-गल्ली नं १०, वडाळारोड, भारतनगर, नाशिक असे सांगितले. त्यास उक्त गुन्हया बाबत विचारपुस करता त्याने सदश्या गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीतास पुढील कारवाईकामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस उप-आयुक्त श्री. प्रशांत बचाव., मा. सहा. पोलीस आयुक्त श्री संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड, सपोनि/हिरामण भोये, पोउनि/सुदाम सांगळे, पोहवा/विशाल काठे, प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, प्रदिप म्हसदे, संविप भांड, विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, रमेश कोळी, धनंजय शिंदे, मुक्तार शेख, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, गोरक्ष साबले यांनी केलेली आहे.