बसमधून प्रवास करणा-या प्रवाशांची दागिने चोरी करणा-या दोन महिला जेरबंद…

सह संपादक- रणजित मस्के
सांगली ;४,५९,१००/-रु. चा मुद्देमाल हस्तगतपोलीस स्टेशनअपराध क्र आणि कलमसांगली शहर६१/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२)फिर्यादी नावसौ. स्वाती सुर्यकांत नाडगौडा, रा यड्राव फाटा, इचलकरंजी, जि कोल्हापूरगु.घ.ता वेळ व ठिकाणदि. ०७/०२/२५ रोजीचे १४.०० वा. ते १५.०० वा. चे सुमारास सांगली एस. टी. स्टैंड येथेगु.दा.ता वेळ०८/०२/२०२५ रोजी २०.५५ वा.माहिती कशी प्राप्त झाली पोह/ हणमंत लोहारकारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदारमा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे,मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शानाखालीपोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली सहा. पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोहेकों / उदय साळुंखे, हणमंत लोहार, संजय पाटील, अतुल माने, दुर्गा कुमरे पोना/ सोमनाथ गुंडे, पोशि / प्रमोद साखरपे, सुनिल जाधव, अभिजित ठाणेकर, रोहन घस्तेअटक दि. ११/०२/२०२४ रोजी १०.५० वा.आरोपींची नावे व पत्तेमहिला आरोपी नामे१) वर्षा इकबाल लोंढे, वय २) सपना राजू चौगुले, वय ३५ वर्षे, रा २७ वर्षे, रा हातकणंगले, जि कोल्हापूर. हातकणंगले, जि कोल्हापूर.उघडकीस आलेला गुन्हासांगली शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ६१/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२)जप्त मुद्देमाल१) ४,५९,०००/- रू. किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र, नेकलेस असे ५४.८६० ग्रॅम वजनाचे दागिने.२) १००/- रु. किंमतीची एक हॅन्डपर्स जु. वा. कि. अ.४,५९,१००/-रू. एकूणगुन्हयाची थोडक्यात हकीकतमा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.त्या अनुशंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहा. पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकामधील पोह/हणमंत लोहार यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, सांगली येथील अंकली गावातील कृष्णा नदीचे पुलाचे अलीकडे लाकडी खेळण्याचे दुकानासमोर दोन महिला चोरीचा माल घेवून थांबलेल्या आहेत.नमुद बातमीप्रमाणे पथक हे अंकली नदीचे पुलाजवळ जावून वॉच करीत असता दोन महिला सदर ठिकाणी थांबलेल्या दिसल्या. तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना महिला पोलीस हवालदार दुर्गा कुमरे यांचे मदतीने सहा. पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे १) वर्षा इकबाल लोंढे, वय ३५ वर्षे, रा हातकणंगले, जि कोल्हापूर २) सपना राजू चौगुले, वय २७ वर्षे, रा हातकणंगले, जि कोल्हापूर अशी सांगितली. सहा. पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन यांनी त्यांचे अंगझडतीचा उददेश कळवून महिला पोलीस हवालदार दुर्गा कुमरे यांनी पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता वर्षा लोंढे हिचे कब्जातील हॅन्डपर्स मध्ये सोन्याचे दागिने व स्वाती सुर्यकांत नाङगोंडा नावाचे आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड, पोस्टाचे कार्ड मिळून आले. तिस सदर सोन्याचे दागिने व स्वाती नाङगोंडा यांचे नावाबाबत विचारले असता त्यांनी ५ दिवसापूर्वी दुपारच्या वेळेमध्ये सांगली एस. टी. स्टॅण्ड येथे एक महिला एस. टी. मध्ये चढत असताना आम्ही दोधींनी सदर महिलेची पर्स चोरी केली असल्याची कबुली दिली.सदर बाबत सांगली शहर पोलीस ठाणेचे क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली.सदर महिला आरोपी ह्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांचेवर सांगली व कोल्हापूर येथे चोरीचेगुन्हे दाखल आहेत.सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी सांगली शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत,