बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने सोलापुर जिल्हयातील मोटारसायकल चोरी करणारे चोर केले गजाआड…

उपसंपादक – रणजित मस्के
सोलापूर :- मा. श्री. शिरीष सरदेशपांडे पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, मा. श्री. हिंमत जाधव अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण यांचे सुचनेप्रमाणे सोलापुर जिल्हयातील मोटारसायकल चोरीस प्रतिबंध करणेच्या आदेशान्वे मा. श्री. जालिंदर नालकुल सो, पोलीस उपअधिक्षक बार्शी विभाग बार्शी व मा. श्री. संतोष गिरीगोसावी सो, पोलीस निरीक्षक बार्शी शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाणे भाग ५ गुरनं. ५७५/२०२३ भा.द.वि.सं. कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयातील चोरीस गेलेली मोटारसायकल घेवुन दोन इसम कुर्डुवाडी बार्शी रोडने शिवाजीनगर बार्शी येथून जात आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांनी लागलीच त्यांचा पाठलाग करून त्यांना जैन मंदीर कुर्डुवाडी रोड बार्शी येथे पकडले त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव
०१) गोपाळ महादेव निकम वय ३० वर्षे, रा. भोईजे बार्शी ता. बार्शी जि. सोलापुर,
२) खंडू चंद्रकांत सुखसे, वय ३३ वर्षे, रा. जहागीरवाडी, ता. जि. उस्मानाबाद, सध्या रा. खामगाव, बार्शी ता.बार्शी जि. सोलापुर असे असल्याचे सांगीतले, त्यांना त्यांचे जवळ असणारे मोटार सायकल बाबत चौकशी केली असता प्रथम ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागल्याने त्यांना अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी सदरील मोटार सायकल ही श्री भगवंत मंदीर बार्शी येथुन चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली. सदर आरोपीस अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केले असता त्यांच्याकडून बार्शी शहर, बार्शी तालूका, वैराग, सोलापूर तालूका या भागातुन चोरुन आणलेल्या एकुण २,५५,०००/- रू किंमतीच्या ०७ मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

सदरची कानगीरी ही गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदारांनी शिताफिने, कौशल्याने केली आहे. सदरची कामगीरी ही गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि / सुधीर तोरडमल, सपोफी / अजित वरपे, पोना / ११६२ मनिष पवार, पोना / ९१२ वैभव टेंगल, पोना / १६६७ अमोल माने, पो कॉ / १७४८ ज्ञानेश्वर घोंगडे, पोकॉ/ ८५६ अर्जून गोसावी, पोका / ४५७ रविकांत लगदिवे, पोका / २१११ अंकुश जाधव, पोका / १९७४ सचिन देशमुख, पोकों/ ७८७ अविनाश पवार, पोकॉ/ ११८२ रतन जाधव सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोना / ११६२ मनिष पवार हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com