बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने चिंचुक्या चोरीमधील ५ आरोपीस अटक करुन ३४१००/- रू.चा मुददेमाल केला हस्तगत..

उपसंपादक-रणजित मस्के
बार्शी :- दिनांक २५/०५/२०२४ रोजी फिर्यादी आदित्य आतुल सोनीग्रा यांचे तुळजापुर रोड मांगडे चाळ येथील पत्राचे गोडावुन मधुन ६४२००/- रू किमंतीचे चिंचुक्याची ४० पोती कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरले बाबत बार्शी शहर पोलीस ठाणेस गु.र.नं.४३२/२०२४ भादविसं कलम ४५७,४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे.



दिनांक १२/१०/२०२४ रोजी सपोनि/दिलीप ढेरे, पोकॉ/१९७४ सचिन देशमुख, पोकों/२०० राहुल उदार, पोकॉ/७८७ अविनाश पवार, पोकॉ/१९९५ सचिन नितनात, पोकों/धनराज फत्तेपुरे असे बार्शी शहरात पेट्रोलिंग करीत असताना बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, सोनीग्रा यांचे पत्रा शेड मधील चिंचुका हा १) सौरभ चंदन पवार वय २३ वर्षे रा. बारंगुळे प्लॉट बार्शी ता. बार्शी जि. सोलापुर २) गणेश संजय रगडे वय २३ रा. मांगडे चाळ बार्शी ता. बार्शी जि. सोलापुर ३) आरबज रजाक सय्यद वय २२ रा. मांगडे चाळ बार्शी ता. बार्शी जि. सोलापुर ४) मलीक मुबारक शेख यय २० रा. नाळे प्लॉट बार्शी ता. बार्शी जि. सोलापुर ५) सुमीत प्रभाकर पवार वय १९ रा.अलिपुर रोड बार्शी ता. बार्शी जि. सोलापुर यांनी चोरला असुन तो बार्शी येथील व्यापा-यांना विकी केला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने यातील सर्व आरोपीना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी सदर चोरीची कबुली दिली असुन त्यांनी गेले माला पैकी २० पोती चिंचुका किमंत रू ३४१००/- रू चे २० पोती चिंचुका हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक मा. श्री. अतुल कुलकर्णी सो।, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर सोो, यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. जालीदर नालकुल उप विभागिय पोलीस बार्शी विभाग, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे बार्शी शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि/दिलीप ढेरे, पोसई /उमाकांत कुंजीर, पोहेका / १६४ दबडे, पोहेकों / १६६७ माने, पोहेकॉ / १९३ घाडगे, पोहेकॉ/१७२९ खराडे, पोना/७५९ मुळे, पोकॉ/१९७४ देशमुख, पोकों/२०० उदार, पोकॉ/११९५ नितनात, पोकॉ/७८७ पवार, पोकॉ/२१३२ फत्तेपुरे, पोकों/२१११ जाधव, पोकों/२०२१ अकुलवार, पोकॉ/२१९३ अंकुशराव, पोकॉ/८९५ बहिरे सर्व ने. बार्शी शहर पोलीस ठाणे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील रतन जाधव यांनी केली असून त्याबाबत पुढील तपास पोहेकॉ / १६४ बाळासाहेब डबडे बार्शी शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com