बार्शीत पोलीस जाणीव सेवा संघातर्फे श्री दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन संपन्न..

उपसंपादक-रणजित मस्के
सोलापूर:– पोलीस जाणीव सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री रवीसर फडणीस यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच बार्शी तालुका प्रमुख सम्मेद तरटे यांच्या अध्यक्षतेखाली बार्शी परंडा रोड येथे श्री दत्त जयंती निमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन पोलीस जाणीव सेवा संघ शाखा बार्शीच्या वतीने करण्यात आले.
यावेळी अतिशय उत्सुकतेने सर्व संघाचे पुरुष व महिला कार्यकर्ते सहभागी होऊन सर्वांनी मोलाचा वाटा उचलला.
यावेळी 1700 ते 2000 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच संघाचा पोलीस बंदोबस्त ही यावेळी करण्यात आला.

यावेळी पोलीस जाणीव सेवा संघाचे बार्शी महिला शहराध्यक्षा कौशल्याताई राऊत, उपाध्यक्षा भाग्यश्रीताई बोंडवे,सदस्या- ज्योतीताई उबाळे,पूजाताई पुरी, गणेश शिरतोडे,अविनाश पाचंगे, रमेश कानडे, विशाल भिसे तसेच हा महाप्रसादाचा कार्यक्रम ऋषिकेश देवधरे व रविराज तुंगतकर यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com