कुणबी युवा मेळावा निमित्त “बळी पहाट” कार्यक्रमात सुरक्षा पोलीस टाइम्स चे पत्रकार श्री. भास्कर पवार यांचा विशेष सन्मान

कुणबी-ओबीसी वर्गातील अनेक मान्यवरांची उपस्थिती..
समाजात उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या युवा संघटना व कार्यकर्ते यांचा करण्यात आला सन्मान,,,
मुंबई प्रतिनिधी – मंगेश घडवले
मुंबई:(लोअर परेल येथे दिनांक.5नोव्हेंबर 2021 रोजी बळी पहाट- शोध इतिहासाचा, सत्य सांस्कृतीचा… ह्या बहुचर्चित कार्यक्रमाला मुंबईत समाज बांधवांची प्रचंड उपस्थिती लाभली. बलिप्रतिपदा दिवशी, शेतकरी कष्टकरी समाजाचा राजा सम्राट बळीराजा यांचा सत्य इतिहास समजून घ्यायला सकाळी 6 वाजता मुंबईतील दामोदर नाट्यगृह, परेल येथे मोठ्या संख्येने बंधू भगिनी उपस्थित होते. सोबत कुणबी युवा अध्यक्ष माधव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

प्रस्त्वाविक व सूत्रसंचालन सचिव युवराज संतोष व सह सचिव मिलिंद चिबडे व वैभव वालम यांनी केले. महिला मंडळाच्या सेक्रेटरी दिपीका आंग्रे तसेच स्नेहा खापरे, युगंधरा काजारे, सानवी मोरे तसेच युवाचे पदाधिकारी उपाध्यक्ष डॉ. मंगेश सानप, अमेय खापरे, शैलेश कावणकर, सहसचिव वैभव वालम, मिलिंद चिबडे, रमेश करंजे आणि सहकारी यांनी नियोजन मध्ये मोलाची भूमिका पार पाडली, ओबीसी जनमोर्चा अध्यक्ष मा. आमदार अण्णाभाऊ शेंडगे तसेच विधान परिषदेचे युवा आमदार अनिकेतभाई तटकरे, कुणबी संघाचे माजी सरचिटणीस मधुकर तोरस्कर, उपाध्यक्ष बबन उंडरे, मा. सरचिटणीस अरविंद डाफळे आणि संघ कार्यकारणी यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करण्यात आले. नियोजन व व्यवस्थापन कुणबी युवा ब्रिगेडच्या शिलेदारांनी उत्तम केले. संघ पदाधिकारी मा. भास्कर चव्हाण, गणेश मौले, अशोक करंजे, हरिश्चंद्र पाटील, गुहागरचे अध्यक्ष कृष्णाजी वणे, संघ कार्यकारणी सदस्य संभाजी काजरेकर, रोहा तालुका ओबीसी जनमोर्चा अध्यक्ष सुरेश मगर, तळा पंचायत समितीच्या सभापती सौ. अक्षरा सचिन कदम कुणबी कलामंच डायरेक्ट सुभाष गोताड, सौ. रुचिता बोलाडे विचारमंचावर उपस्थित होते. बळी पहाट निमित्ताने कुणबी समाजोन्नती संघाचा १०१ वर्षाचा इतिहास यावेळी कुणबी कला मंचाच्या ७० शिलेदारांनी सादर केला, निवेदक युवराज संतोष यांच्या लेखणीतून व दिग्दर्शक सुभाष गोताड यांच्या कल्पक दिग्दर्शनाने हि कलाकृती निर्माण झाली होती. यावेळी 29 सक्रिय शिलेदार यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला या वेळी रोहा तालुका कुणबी युवा मुंबई सचिव,सुरक्षा पोलीस टाइम्स चे प्रतिनिधी श्री.भास्कर पवार यांना परिवर्तनाचे साथीदार या सन्मानाने बळी पहाट कार्यकामात उपस्थित मान्यवर ओबीसी अध्यक्ष मा. आमदार आण्णा भाऊ शेंडगे, विधानसभा आमदार अनिकेत भाई तटकरे सन्मानीय कुणबी युवा अध्यक्ष. माधव कांबळे साहेब,कुणबी समाजोन्नती संघ सहसेक्रेटरी श्री. भास्कर चव्हाण साहेब यांच्या हस्ते गौरवण्यात आले .
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com