बार कौन्सिलच्या सदस्यांनी आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण करावे – माजी सचिव ॲड.श्री राहुल बोडके साहेब यांची मागणी

पंढरपूर

प्रतिनिधी – उमेश वाघमारे
एडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करण्याच्या मागणीसाठी पंढरपूर अधिवक्ता संघाचे सदस्य ॲड. प्रतापसिंह शेळके व ॲड. शक्तिमान माने हे उपोषणावर बसले आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपूर अधिवक्ता संघाचे माजी सचिव ॲड. राहुल बोडके साहेब यांनी आज उपोषणस्थळी भेट दिली.
या भेटीदरम्यान ॲड. राहुल बोडके साहेब यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा या राज्यस्तरीय संघटनेने आता केवळ निवेदनापुरते मर्यादित न राहता आक्रमक भूमिका घेतली पाहिजे, असे मत व्यक्त केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “बार कौन्सिलचे सर्व सदस्य यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण करावे, जेणेकरून सरकारवर दडपण निर्माण होईल आणि राज्यात वकिलांसाठी संरक्षण कायदा तत्काळ लागू केला जाईल.”
यावेळी उपस्थित वकिलांनीही ॲड. राहुल बोडके साहेब यांच्या मागणीला पूर्ण पाठिंबा दर्शवला आणि ही लढाई संपूर्ण राज्यातील वकिलांची असल्याचे नमूद केले.