बँकेची बनावट एन.ओ.सी तयार करुन लोन वरील महागड्या कार परराज्यात विक्री करणाऱ्या अंतरराज्य टोळीला आचोळे पोलीसांनी ठोकल्या बेडया…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

नालासोपारा :– विविध राज्यातून २,३४,५३,३०२/- किंमतीच्या १२ कार केल्या जप्त..!

दिनांक २८/०९/२०२३ रोजी यातील फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, त्यांना ऑक्टोबर २०२२ मध्ये आरोपीत याने तो बैंकेचा सी.ए आहे अशी ओळख करून देवून तो बैंकांचे ऑडीट करीत असल्याचे सांगुन फिर्यादी यांचे किराणा दुकानाच्या व्यवसायासाठी २,००,००,०००/- रुपये (२ कोटी) लोन मंजूर करुन देतो असे सांगून त्यांचे व्यवसायाबाबत माहीती व दुकानाची कागदपत्र, घेवुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांचे त्यांचेकडून विविध बँकेमधो कर्ज मंजूर करण्यासाठी त्यांचे बैंक अॅप्लीकेशन फॉर्म भरुन घेवून ती कागदपत्र महागड्या कार खरेदी करण्यासाठी बँकेमध्ये जमा करुन फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या नावे महागड्या कंपनीच्या कार खरेदी करुन त्यावर बनावट कागदपत्र व बनावट मेल द्वारे बैंकेंचे वेग वेगळ्या बँकेचे कर्ज मंजूर करुन सदरच्या कार फिर्यादी यांचे ताब्यात न देता त्यांची एकूण २,८४,४९,०००/- रुपये इतक्या रक्कमेची फसवणूक केल्या बाबत आचोळे पोलीस ठाणे, गु.र.नं-४६९/२०२३ भादवि कलम ४०६,४२०,४६५,४६७,४७१,१२० (ब) प्रमाणे दि.२८/०९/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील प्रमाणे महागड्या कार खरेदी करून २,८४,४९,०००/-रुपये रक्कमेची फसवणूक झालेबाबत
गुन्हा नोंद झाल्यानंतर तसेच फसवणूक करणारी अंतरराज्य टोळी असण्याची शक्यता असल्याने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्यार पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाखाली नमुद आरोपी यांचा शोध प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे गु शाखेचे अधिकारी अंमलदार हे गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाद्वारे पाहिजे आरोपी यांचा शोध घेत
होते.

सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी नामे राहुल गिरीश शहा हा त्याचे स्वतःचे अस्तित्व लपवुन पुरावे नष्ट करुन बनावट आधार कार्ड व त्यावर स्वतःचे नाव बदलून कर्नाटक, पश्चिम बंगाल, दिल्ली व नेपाळ अश्या वेग वेगळ्या राज्यातील आलिशान हॉटेलमध्ये वास्तव्य करीता होता. त्यामुळे नमुद आरोपी मिळून येत नव्हता. करीता आरोपी वाचे विरुध्द पुरावे प्राप्त करुन तांत्रीक विश्लेशनाद्वारे शोध घेत असताना नमुद आरोपी हा हॉटेल मेलुहा “द” फर्न, पवई मुंबई या हॉटेलमध्ये वास्तव्य करीत असल्याबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली.

करीता नमुद आरोपी याचा सदर हॉटेलमध्ये जावून शोध घेतला असता तो सुरेश गोपाळ भगत या नावाचे बनावट आधारकार्ड देवुन वस्तव्य करीत असल्याचे निष्पन्न झाले. नमुद आरोपी यास सदर इंटेिलमधुन ताब्यातून घेवून त्यांना सदर गुन्ह्यात दि.०३/०२/२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी याचे ताब्यात वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावे असलेली ०८ सिमकार्ड, १ नेपाळ देशाचे सिम कार्ड, ०२ लॅपटॉप, ०१ आय पेंड, ०९ मोबाईल व ०३ बनावट नायची आधार कार्ड असा एकूण ३.३४,०००/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला आहे.

त्याचबरोबर नमुद अटक आरोपी यांचेकडे फेडरल बैंक व टि.एन.बी या बँकेच्या बनावट एन.ओ.सी मिळून आल्या आहेत.

तपासादरम्यान यातील आरोपी हे फिर्यादी यांना माझी बैंकेमध्ये चांगली ओळख आहे असे भासवुन मी तुमचे लोन करुन देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांचेकडुन लोन संदर्भात लागणारी कागदपत्र प्राप्त करून सदरची कागदपत्र सुमारे १० ते १५ बैंकेमध्ये जमा करुन फिर्यादी यांचे बनावट ईमेल आय.डी तयार करुन त्या आधारे फिर्यादी यांच्या नावे परस्पर महागड्या कंपनीच्या कार खरेदी करुन सदरच्या कार खरेदी करण्यासाठी फिर्यादी यांचा बनावट पत्ता नमुद करुन त्यावर कारचे आर.सी बुक प्राप्त करुन तसेच नमुद कारवर असलेल्या लोन कमी झाले असल्याचे संबधीत बँकेची बनावट एन.ओ.सी तयार करुन ती आर.टी.ओ यांना सादर करुन त्या कार परराज्यात विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

नमुद गुन्ह्यात आरोपी नामे

(१) राहुल ऊर्फ सचिन ऊर्फ सौरभ गिरीष शहा वय-४१ वर्षे रा.रु नं- ३/९/१४०४, समर्थ को.ऑ.ऑ.हौ. सोसा. मिलत नगरच्या समोर, ओशिवरा, अंधेरी पश्चिम, मुंबई ५३ यास अटक करुन त्याचे अटकेदरम्यान आरोपी नामे

(२) विजय सुरजमनी सिंग वय-४९ वर्षे, व्यवसाय- रियल ईस्टेट एजन्ट, रा.रु.नं १०१, धनेशकृपा को.ही.सो. वर्सेत विहार, म्हाडा, ठाणे पश्चिम ता.जि.ठाणे

(३) भिकाजी ऊर्फ उमेश बबन गोपाळे, रा.रु नं-२१०, पि-१ बिल्डींग, स्वप्न नगरी, चाकण, पुणे, मुळ रा. मु.पो.आडगाव, ता.खेड राजगुरु नगर, जि.पुणे

(४) मोहम्मद नजर मो. जाफर खान वय-४० वर्षे व्यवसाय-झोमॅटो डिलीव्हरी रा.१६, नजर मंझील, आमवाली, मस्जिदजवळ जहांगिराबाद, भोपाल राज्य- मध्यप्रदेश

(५) प्रविण ऊर्फ राणु हुकूमचंद जैन वय ३४ वर्षे, व्यवसाय-खरेदी विक्री, रा.रु नं-१०३, सुप्रिम ब्लोज, सेक्टर नं-०२, चारकोप गावं, मुंबई मुळ रा.मुळ रा.१/१, क्लब पार्क, जुना बस स्टॅन्ड, ता. गंज बायुदा, जि.विदीशा राज्य-मध्यप्रदेश

(६) आकाश धोंडीभाऊ मुसळे वय-२५ वर्षे, व्यवसाय नोकरी रा.रुनं- ०१, बावकर निवास, शिव गल्ली, वर्सोवा, अर्धेरी पश्चिम, मुंबई

(७) विवेक रामदास करंडे वय-२५ वर्षे, व्यवसाय-नोकरी रा. जोसेफ पटील वाडी, सात चंगला, आराम नगर-१, आंधेरी पश्चिम, मुंबई असे एकुण ०७ आरोपींना अटक करुन त्यांचेकडे कौशल्यपूर्ण तपास करुन त्यांचे ताब्यातुन खालील वर्णनाच्या व २,३४,५३,३०२/- रुपये किंमतीच्या एकूण १२ महागड्या कार जप्त करण्यात आल्या आहेत.

मेंडेल नं BMW 201

MAHINDRA XUV-

300 MAHINDRA THAR

TOYOTA URBAN

CRUSER MAHINDRA THAR

गाडी नंबर NOT REGISTERED

GJ-06-PK-9107

GJ-06-PL-1323

MH 48 CK 4467

NOT REGISTERED

किमत 56,00,000/-

15,00,000/-

15,00,000/-

19,00,000/-

15,40,000/-

MAHINDRA THAR

GJ-06PK-9320

15,40,000/-

KIA SELTOS

23 BH 9551 M

24,00,000/-

HYUNDAI CRETA

23 BH 6057 G

20,42,000/-

MAHINDRA SCORPIO

23 BH 3660 G

16,81.302/-

TOTAL 2,34,53,302

वरील प्रमाणे अटक आरोपी यांचेकडुन एकुण २,३७,८७,३०२/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन खालील गुन्ह्याची यशस्वी उकल केली आहे.

पोलीस ठाणे
आचोळे

गुन्हा रजि नं व कलम

गु.र.नं. ४६९/२०२३ भादविस कलम ४०६,४२०,४६५,४६७,४७१,१२०
(ब)

आचोळे

गु.र.नं. ७२/२०२४ भा.द.वि.से कलम ४०६,४२०,१२० (ब)

वडोदरा, गुजरात गु.र.नं. १११९६०१०२०००५५/२०२० भादविस कलम ४०६,४२०,४६५, ४६७,४७१,१२० (व)

अंकलेश्वर, गु.र.नं. १११९९००४२३०/२०२० भादविस कलम ४०६,४२०,५०६ (२), १२० (च) गुजरात

डायघर, ठाणे

गु.र.नं.१७५/२०२१ भादवि कलम ४०६,३४ प्रमाणे

नमुद गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार आरोपी नामे राहुल ऊर्फ सचिन गिरीष शहा वाचा गुन्हे अभिलेख तपासला असता त्याचेवर यापूर्वी विविध राज्यात खालील प्रमाणे गुन्हे नोंद आहे.

पोलीस ठाणे

बडोदरा, गुजरात

अंकलेश्वर, गुजरात

ओशिवरा, मुंबई शहर ओशिवरा, मुंबई शहर

CBI EOW

कांजूर मार्ग, ओशिवरा, मुंबई शहर

जोगेश्वरी, मुंबई शहर

जोगेश्वरी, मुंचई शहर

बोरीवली, मुंबई शहर सायन, मुंबई शहर

बांद्रा, मुंबई शहर

गुन्हा रजि नं व कलम

गु.र.नं. १११९६०१०२०००५५/२०२० भादविस कलम ५०६, ४२०,४६५,४६७,४७१,१२० (३)

गु.र.नं. १११९९००४२३०/२०२० भादविस कलम ४०६,४२०, ५०६(२),१२० (ब)

गु.र.नं.५४/२०१६ भादचिस कलम ४६५,४६७,४६८,४७१,४२०

गु.र.नं.१३०/२०१६ भादविस कलम ४६५,४६७,४६८,४७१, ४२०,

४७२.३४ गु.र.नं. ०४/२०१२ भादविस कलम ४२०,४६७,४६८,४७१

गु.र.नं. २०/२००८ भादविस कलम ४२०,४६५,४६८,३४

गु.र.नं. ५१/२००८ भादविस कलम ४६५,४६७,४६८,४१७१,

४२०,४०६,३४ गु.र.नं. ५१/२००८ भादविस कलम ४६५,४६७,४६८,४७१,
४२०,४०६,३४

गु.र.नं. ४९/२००७ भादविस कलम ४२०,४६५,४६८,४२० गु.र.नं. ०२/२००७ भादविस कलम ४०६,४२०

गु.र.नं.१०६/२००७ भादविस कलम ४२०,४६५,४७१,३४

गु.र.नं. ५३/२००७ भादचिस कलम ४२०,४६५,४६७,४६८,

४७१.१३८.३४

सदरची कामगिरी मा.श्री. मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त सो, मा.श्री श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त साो, मा.श्रीमती पौर्णिमा चौगुले-श्रींगी, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. श्री.उमेश माने- पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त तुळींज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. बाळासाहेब पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आचोळे पोलीस ठाणे, पोनि/विवेक सोनवणे, (गुन्हे), पोनि/विजय चव्हाण, तपास पथकाचे सपोनि/यशपाल सूर्यवंशी, पोउनि/सुहास म्हात्रे, पोहवा दत्तात्रय दाईगडे, पोहवा/शंकर शिंदे, पोअं/निखील चव्हाण, पोअं/विनायक कचरे, पोअं/अमोल सांगळे, पोअं/मोहनदास बंडगर, पोअं/मनोज पाईकराव, पोअं/अमोल बरडे, नेम.पो.उ.आयु कार्या. परि २ वसई यांनी यशस्वी रित्या केलेली आहे. पुढील तपास सपोनि/यशपाल सुर्यवंशी हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट