बांगलादेशींविरोधात भिवंडी पोलीसांची मोठी कारवाई….

0
Spread the love

भिवंडी : सदर बांगलादेशी हे वळगाव,प्रितेश कंपाऊंड ,कामतघर येथील चाचा-भतिजा कंपाऊंड येथे मजुरीवर काम करीत असून भिवंडीत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या 40 बांगलादेशींना अटक करण्यात भिवंडी पोलीसांना यश आले आहे.

नारपोली पोलीस ठाणे

भिवंडी पोलिसांनी एकाच महिन्यात ही बांगलादेशी विरोधात ही दुसरी मोठी कारवाई पोलिसांनी छापा टाकून या 40 बांगलादेशीना अटक केली आहे. तसेच अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींकडून पासपोर्ट, आधार कार्ड, पॅनकार्ड, व 28 मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.

शांतीनगर पोलीस ठाणे
भिवंडी पोलीस ठाणे

नारपोली पोलिसांनी छापा टाकून 1) राजू मिया उर्फ राणा रहीम मिया -32 , 2) मिजानूर रहेमान अब्दुल रहेमान -32 , 3) बप्पीअली उर्फ इजाजुल जाफरअली -27 , 4) शामिम उस्मान अली शेख-27, 5) बिलाल फरीद खान- 19 , 6) ओस्मान रौफीक खान -24, 7)शमीम अहमद अब्दुल कुददुस आहमद – 31, 8) मोहमद आमीन मोहमद अजिदूर रहेमान अन्सारी -40 , 9) हलाउद्दीन अनामिया – 20 , 10) फारूक सौफिक आलम – 26 अशा 10 बांगलादेशींना अटक केली आहे .


हे बांगलादेशी वळगाव येथील प्रितेश कंपाउंड कामतघर येथील चाचा भतीजा कंपाउंडमध्ये मजुरी करत असल्याची खबर नारपोली पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी छापा टाकून या 10 जणांना अटक केली आहे.


तसेच शांतीनगर पोलिसांनी छापेमारी करत तब्बल 20 बांगलादेशींना अटक केली आहे . शांतीनगर पोलिसांनी 1) मोहम्मद इमोन मोहम्मद आलमबीर खान उर्फ इमाम खान – 20 , 2) राजू महमंती इमानली उर्फ राजू शेठ – 20 व इतर अठराजण अशा 20 बांगलादेशींना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वास्तव करताना आढळून आल्याने अटक केली.

तसेच भिवंडी शहर पोलिसांनी हद्दीतील अवैध राहणाऱ्या 1) तारा खुशबार मंडळ, 2) शाहजमाल मो. गुलाम मुस्तफा आणि इतर आठ अशा दहा जणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे .

तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल चाळीस बांगलादेशींना भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे . त्यांच्याकडून पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड , 28 मोबाईल पोलिसांनी जप्त केले असून अजून असं कोणी राहत आहे का याचा तपास सध्या पोलिस करत आहेत.

बांगलादेशाचा विझा नसताना पैसे कमावण्याच्या उद्देशाने छुप्या मार्गाने दलालाच्या मदतीने बांगलादेशातून भिवंडीत येतात आणि अनधिकृतपणे वास्तव्यास राहून मजुरी करीत असल्याचे आढळून आले आहेत. पुढील अधीक तपास भिवंडी पोलीस करत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

         
      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट