बाणेर पोलीसांनी घरफोडी करणा-या सराईत चोरट्यांना केले जेरबंद, चोरीचे विविध गुन्हे उघडकीस..

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

पुणे

बाणेर पोलीस स्टेशन पुणे शहरच्या कार्यक्षेत्रात दि ०७/०६/२०२५ रोजी ते दि ०९/०६/२०२५ रोजी सकाळी ०७/३० दरम्यान फ्लॅट मुक्ता रेसीडेन्सी, पी एम टी बसस्टॉप जवळ, बाणेर, सुतारवाडी, पाषाण पुणे येथे अज्ञात चोरटयांनी फिर्यादी यांच्या दरवाजाचे लॉक आणि कडीकोंडा तोडुन फिर्यादी यांच्या घरामधील एकुण ५,४३,५००/- रु.कि चे सोन्या चांदीचे व दागिने रोख रक्कम चोरी करुन लंपास झालेले होते. सदरबाबत बाणेर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुर नं १२२/२०२५ ना.न्या.स. कलम ३३१ (३),३३१ (४),३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा गुन्हा करणारे अज्ञात आरोपी यांचा बाणेर पोलीस स्टेशनकडील तपास पथक शोध घेत असताना आरोपी यांना शोधण्याइतपत कोणताही ठोस पुरावा नसतांना बाणेर पोलीस स्टेशनकडील तपास पथक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी अत्यंत कसोशिने घटनास्थळावर मिळुन आलेले सीसीटीव्ही फुटेज चेक करुन त्याद्वारे यातील गुन्हा करणारे आरोपी यांचा पाठलाग करुन दाखल गुन्हयाच्या घटनास्थळावरील सीसीटीव्हीमधील आरोपी यांच्या शारीरीक रचनेला मिळताजुळता संशयीत आरोपी नामे १) शाहरुख फारुख शेख, वय २१ वर्षे, रा. बापु काटे चाळ रुम, पवावस्ती दापोडी, पुणे यास ताब्यात घेतले असता त्याने त्याचे साथीदार नामे २) गुलफान नफिस अन्सारी उर्फ शेख वय १९ वर्षे रा.राजा वाईन्सच्या मागे, सिध्दार्थ नगर, दापोडी पुणे ३) अर्जुन गणपत गायकवाड वय १९ वर्षे रा. तरवड वस्ती कांजारभट, घुले यांचे मैदान हडपसर, पुणे यांच्यासह मिळुन वरिल गुन्हा केल्याची कबुली दिल्याने, आरोपी क्र ०१ ते ०३ यांना अटक करुन त्यांच्याकडुन फिर्यादी यांच्या चोरीस गेल्या मालापैकी ८०.४२२ ग्रॅम सोन्याचे दागिने, व चोरी करून प्राप्त केलेल्या पैश्यातुन खरेदी केलेली ०१ दुचाकी गाडी, आणि दोन मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच बाणेर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं.१४४ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्यातील चोरीस गेलेली पल्सर १२० गाडी सुध्दा वरील आरोपीकडुन जप्त करण्यात आली आहे.

बाणेर पोलीस स्टेशन दाखल गुन्हा १४१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०९ (४),३ (५) या गुन्हयामधील आरोपींचा शोध घेवून आरोपी नामे ०१) सनि गौतम खंडागळे वय २० वर्षे रा. भेगडे आळी, घोरवडी रेल्वे स्टेशन रोड, तळेगाव दाभाडे, ता. मावळ जि. पुणे २) कार्तीक भाऊ पोटफोडे वय १८ वर्षे रा. डी विंग-१०५, मंत्रा सिटी, तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे वांना अटक करुन त्यांचेकडुन फिर्यादीकडुन जबरीने काढुन घेतलेला मोबाईल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त, परि. ४, पुणे शहर श्री. सोमय मुंढे, मा. सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर श्री. विठ्ठल दबडे यांचे सुचने व मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. चंद्रशेखर सावंत, सपोनि के बी डाबेराव, पोउपनि संदेश माने, पोलीस अंमलदार बाबा आहेर, किसन शिंगे, आप्पा गायकवाड, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, गजानन अवातिरक, प्रदिप खरात, प्रितम निकाळजे, शरद राऊत, विकास भोरे, रोहीत पाथरुट सर्व नेमणुक बाणेर पोलीस ठाणे पुणे शहर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट