गोरेगाव पोलीसांनी मौजा- म्हसगाव येथील 55 वर्षीय इसमाचे खुन प्रकरणाचा केला उलगडा..

उपसंपादक – रणजित मस्के
गोंदिया :– ▶️ याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, घटना दिनांक- 01/05/2024 रोजी चे रात्री अंदाजे 22.00 वाजता ते दिनांक 02/05/2024 रोजीचे 03.30 वाजता दरम्यान यातील महिला फिर्यादी नामे- सौ.धनवंता धिवरू ईडपाचे वय 51 वर्षे राहणार- गोंड मोहल्ला म्हसगाव, ह्या लग्नाला बाहेरगावी गेले असता त्यांचे पती मृतक नामे – धिवरु ईसन ईडपाचे वय 55 वर्षे हे व त्याची वयोवृध्द आई असे घरी झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात ईसमाने अज्ञात कारणावरुन टंग्याने किंवा त्यासारख्खा धारदार हत्याराने मृतक धीवरु यांच्या तोंडावर, उजव्या डोळ्याच्या खाली, मानेवर डाव्या बाजुला, छातीवर उजव्या बाजुला मारुन मृतकास जिवानिशी ठार मारल्याने फिर्यादी यांचे रिपोर्टवरुन पोलीस ठाणे गोरेगाव येथे अपराध क्रमांक 200/2024 कलम 302 भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले होते….
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक, श्री.नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी, आमगाव श्री. प्रमोद मडामे, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांना तसेच पोलीस ठाणे गोरेगाव चे पोलीस निरीक्षक श्री. अजय भुसारी यांना निर्देश सूचना देवुन सदरचा खुनाचा गुन्हा करणाऱ्या अज्ञात आरोपीचा तात्काळ शोध घेवून खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीस जेरबंद कऱण्याचे निर्देश दिलेले होते….
या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, तसेच पोलीस ठाणे गोरेगाव येथील पोलीस पथके आरोपीचे शोधार्थ नेमण्यात आलेली होती… नेमण्यात आलेल्या पोलीस पथकाने अतिशय संयमाने, बुध्दीकौशल्य, परिश्रमाने खुनाच्या गुन्ह्याचे अनुषंगाने साधारण 100 च्या वर म्हसगाव गावातील लोकांना तसेच मृतक यांचे नातेवाईक, संशयितांना पडताळून विचारपूस चौकशी करून अत्यंत कुशलतेने…. मृतकचा खून करणारा नातेवाईक आरोपी ईसंम नामे – वीरेंद्र बेणिराम इडपाचे वय 29 रा.म्हसगाव ता. गोरेगाव यास ताब्यात घेवून विचारपूस चौकशी केली असता आरोपीने घराच्या जागेच्या जुना वादावरून खून केल्याचे निष्पन्न झाले…आरोपी यास गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे…..गुन्ह्याचा पुढील तपास पो. नि. भुसारी पो. स्टे. गोरेगाव हे करीत आहेत…..
सदरची कामगिरी मा. वरिष्ठांचे निर्देश मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, सपोनि. विजय शिंदे, पोउपनि विघ्ने, मपोउपनि वनिता सायकर, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे संपुर्ण पोलीस पथक तसेच पोलीस ठाणे गोरेगाव चे पोलीस निरीक्षक श्री अजय भुसारी, आणि पोलीस ठाणे गोरेगाव येथील पोलीस पथक यांनी आरोपीस जेरबंद करून गुन्ह्याचे उलगडा केला आहे…
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com