बामणोली गोद नदीवरील पुलाचे स्वप्न साकार होणार माणगांव नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांच्या हस्ते भूमिपूजन….

0
Spread the love

प्रतिनिधी :-सचिन पवार

माणगांव रायगड:- माणगाव :-माणगांव तालुक्यातील बामणोली येथील गोद नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलामुळे यां विभागातील ग्रामस्थांना होणारी गैरसोय कायमची दूर होणार. यां पुलासाठी समस्त बामणोली ग्रामस्थ यांनी साशन दरबारी विशेष पयत्न केल्याने आज यश प्राप्त झाले आहे.हा पूल 50 वर्ष जुना असून यांच्यापासून फार मोठा धोका होता पुलाची अवस्था ढासलेला होता ज्याप्रमाणे महाड सावित्री पूल वाहून गेला होता त्याप्रमाणे होऊ नये यासाठी यां पुलाची नव्याने सुरवात होत आहे.

पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी माणगांव नगरपंचायत चे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार हे बोलीत होते माणगाव बामणोली मागवली, राजवली सुरव खरवली यां गावांना जाण्यासाठी यां गोद नदीच्या पुलावरून ये जा होत असते भविष्यात यां परिसरातील गावकऱ्यांना कोणता धोका निर्माण नं होवो यासाठी यां पुलाचे नव्याने बांधकाम करण्यात येत आहे गोद नदीवरील जुने पूल तोडून नवीन बांधकाम व्हावा हे अनेक वर्षांपासून बामणोली ग्रामस्थांचा स्वप्न होते ते अखेर पूर्ण झाले आहे या खडतर पुलामुळे ग्रामस्थ यांना कसरत करावी लागत होती मात्र या पुलामुळे गैरसोय दूर होणार आहे.

यावेळी बामणोली गोद पुलाचे भूमिपूजन माणगांव नगरपंचायत चे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार बामणोली ग्रामपंचायत सरपंच सुवर्णा सकपाळ उपसरपंच मंगेश पवार,ग्रामपंचायत सदश्य साक्षी दळवी, भारत पवार, स्नेहा खाडे,उज्वला पाखुर्डे, सुशांत पडवळ,स्वाती पाखुर्डे, रंजना कोळी,उज्वला पाखुर्डे तसेच ग्रामस्थ सहदेव सकपाळ, वामन तात्या पवार,दिनेश पवार, सुभाष मालोरे, राजेंद्र सकपाल, गणपत पवार, हरी पवार पोलीस पाटील,संभाजी भालेकर, नथुराम उभारे शांताराम पवार, नथुराम दळवी, विलास मालोरे, नामदेव सकपाळ, सखाराम मुंढे, बाळू तळेकर, भारत महीपत पवार, संतोष सहदेव पवार, वेटू पवार, शांताराम पवार, सदू कठे, आनंद सुतार, दत्ताराम पवार, सखाराम पवार,पत्रकार सचिन पवार, घनश्याम मेहता, विलास शिर्के विलास महादेव पवार, बाळू पवार तसेच समस्त ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन सोहळा पार पाडला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट