बूलेट सायलेन्सरचा फटाका वाजवून नागरीकांना त्रास देणा-या वाहनचालकांच्या विरोधात कोंढवा पोलीसांची धडाकेबाज कारवाई…

सह संपादक- रणजित मस्के
पुणे
दि.०१/०३/२०२५ रोजी पासून सुरू होणा-या रमजान महिन्याच्या अनुषंगाने कोंढवा पोलीसां कडून कोंढवा परिसरात दि.२८/०२/२०२५ रोजी बूलेट दुचाकी गाडीचा सायलेन्सर मॉडीफाईड करून फटाका वाजवून आजुबाजुच्या परिसरात राहणा-या जेष्ठ नागरीकांना, आजारी नागरीकांना तसेच १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांना त्रास देणा-या वाहनचालकांच्या विरोधात विशेष मोहिम हाती घेण्यात आली होती. सदर मोहिमेदरम्यान कोंढवा पोलीसांनी अशा प्रकारच्या एकुण २० बुलेट दुचाकी गाड्यांवर कारवाई करून सदर गाड्यांचे मॉडीफाईड सायलेन्सर काढून ते पुणे मनपाच्या रोड रोलरच्या सहाय्याने नष्ट करण्यात आलेले आहेत.
सदरची विशेष मोहिम हि मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-५, पुणे डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे श्री. धन्यकुमार गोडसे, कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राऊफ शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली.