बालकाकडुन अवैध गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत राऊंड भारती विद्यापीठ पोलीसानी केला हस्तगत

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पूणे

दिनांक २९/०४/२०२५ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफ हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फतीने कात्रजकडुन मांगडेवाडीकडे जाणा-या रोडवर असलेल्या रतन मोटर्स प्रा लि पुणे या कंपनीच्या समोरील बाजुस रोडवर एक इसम गावठी बनावटीचा कट्टा घेवुन थांबला आहे अशी बातमी मिळाली. लागलीच नमुद पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व नमुद अंमलदार यांनी रतन मोटर्स प्रा लि पुणे या कंपनीच्या समोरील बाजुस रोडवर जावुन पाहता तेथे एक विधीसंघर्षीत बालक, वय १७ वर्षे, हा त्याचे ताब्यात ५०,०००/-रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतुस असा एकुण ५०,५००/-रुपयांचे मुद्देमालासह मिळुन आल्याने त्याचेकडुन सदरचा मुद्देमाल हस्तगत करुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २२९/२०२५, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २. श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम पु. साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राहुलकुमार खिलारे, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे, सचिन सरपाले, महेश बावकर, मंगेश पवार, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट