बकऱ्या चोरी करणारी, अकोला जिल्हयातील टोळी स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण यांनी केली जेरबंद

सह संपादक -रणजित मस्के
अमरावती

पो.स्टे. दर्यापुर येथे दिनांक 07/06/2025 रोजी तक्रारदार सौ. दुर्गाबाई हिरालाल चंदनपत्री वय 54 वर्ष धंदा प्रेस दुकान रा. गांधी नगर बनोसा, दर्यापूर यांनी तक्रार दिली कि. त्यांचेकडे 04 ते 05 मोठ्या बकऱ्या व 04 ते 05 लहान बोकूड आहेत. दिनांक 04/06/2025 रोजी तक्रारदार यांनी रोजच्या प्रमाणे सकाळी 10.00 वा. त्यांच्या बकऱ्या घराजवळच चरण्या करीता सोडल्या. सदर बकऱ्या त्यांचे घराजवळ काही अंतरावर चरत होत्या सायंकाळी 06.00 वा. बकऱ्या घरी चरुन परत आल्या तेव्हा त्यामधील 03 लहान बोकुड वय अंदाजे 04 वर्ष प्रत्येकी 4,000/-रु चे असे एकुण 12,000/-रु चे परत आले नाही. त्यांचा तक्रारदार यांनी दांपुर येथील राहत्या परीसरात भरपुर शोध घेतला मिळून आले नाही. वरुन तक्रारदार यांना त्यांचे 03 लहान बोकडाची कुणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी केली अशी खात्री झाले वरुन त्यांनी पो.स्टे. दर्यापूर येथे तक्रार दिली अशा तक्रारदार यांचे तक्रारीवरुन पो.स्टे. दर्यापूर येथे अप. क्रमांक 258/2025 कलम 303 (2) बी.एन.एस. चा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेता मा. पोलीस अधिक्षक श्री. विशाल आनंद सा. अमरावती (ग्रामीण) यांनी सदर गुन्हा उघड करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा अमरावती (ग्रामीण) यांना सुचना निर्गमीत केल्या होत्या.
त्या अनुषंगाने सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती (ग्रामीण) येथील दर्यापुर उपविभागातील पो.उप.नि.नितीन इंगोले यांचे पथकाला उपलब्ध तांत्रीक पुराव्या वरुन तसेच गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक बातमी मिळाली कि, सदरची चोरी अकोला येथील रेहान शाह याचे टोळीने केली आहे. वरुन पथक तात्काळ अकोला येथे रवाना होवुन आरोपी रेहान शाह रेहमान शाह वय 26 वर्ष रा.बी. के. नगर, अकोट फैल, अकोला यास सापळा रचुन ताब्यात घेतले व सदर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने आधी उडवाउडवीचे उत्तरे दिली व अधिक विचारपुस केली असता सदर गुन्हा त्याचे साथीदारांसह केल्याचे कबुल केले वरुन त्याचा गुन्हयातील साथीदार मोबीन शाह कासम शाह वय 47 वर्ष रा.बी. के. नगर, अकोट फैल, अकोला यास ताब्यात घेण्यात आले व त्यांचे कडुन सदर गुन्हयात वापरलेली मारुती कंपनीची सिल्व्हर रंगाची वॅगनॉर क्रमांक MH-30-P-2623 किंमत 3,00,000/-रु एक निळया रंगाचा विवो कंपनीचा मोवाईल किंमत अंदाजे 10,000/-रु व वेगवेगळया गुन्हयात जप्त केलेले नगदी 22,900/- रु असा एकुण 3,32,900/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच यातील आरोपीतांनी अमरावती जिल्हयातील पोलीस स्टेशन शिरजगांव, लोणी, आसेगांव पुर्णा येथील बकऱ्या व बोकुड चोरल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीतांना पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. दर्यापूर याचे कडे सोपविण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. विशाल आनंद सा., अप्पर पोलीस अधिक्षक श्री. पंकज कुमावत सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण वानखडे स्थानिक गुन्हे शाखा अमरावती (ग्रामीण) यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले, पो.हे. कॉ. सुनील महात्मे, सैय्यद अजमत. सुधीर बावणे, निलेश डांगोरे, चेतन दुबे, सर जिप चालक पो.हे.कॉ. हर्षद घुसे, सर्व नेमणुक स्था.गु.शा. अमरावती (ग्रामीण) तसेच पो.स्टे. सायबर अमरावती (ग्रामीण) येथील पो.हे.कॉ. सागर धापड, शिवा शिरसाठ, रितेश गोस्वामी, विकास अंजीकर यांनी केली.