बहुजन विकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार राजेश पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल..

प्रतिनिधी- मंगेश उईके
पालघर :– देशभर लोकसभा निवडणुकांचा वारे जोरदार वाहत आहे.महाराष्ट्रात काही भागात मतदान झाले ही आहे. तर मुंबई आणि आजूबाजूच्या भागात 20 मे रोजी मतदान होणार आहे.
या टप्प्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या पालघर लोकसभा मतदार संघात महायुतीने अजून उमेदवार जाहीर केलेला नाही पण बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा, पक्षाध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कार्यकर्ता मेळावा घेत पालघर लोकसभा निवडणूक नुसती लढवायची नाही तर जिंकण्यासाठी लढायची असा निर्धार करत प्रचाराचे रणशिंग फुंकले होते.
त्यानंतर त्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेतल्या. या मुलाखतीनंतर गुरुवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्य महत्त्वाच्या बैठकीत बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी निश्चित करण्यात आले होते.परंतु याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न करताच आज आमदार राजेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
उपस्थित जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती मनीषा निमकर, माजी महापौर उमेश नाईक, पक्षानेते अजीव पाटील जिल्हा परिषद सदस्य अशा कार्यकर्त्यांसह राजेश पाटील यांनी पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com