बदलापूर पोक्सो अॅक्ट या गुन्हयातील अटक आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर…!

उपसंपादक-रणजित मस्के
ठाणे :-दि.23.09.2024 रोजी बदलापुर पूर्व पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं 380/2024 कलम 65(2),74,75,76 भा. न्या. संहिता सह कलम 4(2),8,10 पोक्सो अॅक्ट तसेच गुन्हा रजि.नं 391/2024 कलम 65 (2), 74,75,76 भा.न्या. संहिता सह कलम 4(2),6,8,10,21(2) पोक्सो अॅक्ट या गुन्हयात अटक व सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे न्यायबंदी असलेला आरोपी नामे अक्षय अण्णा शिंदे, वय 24 वर्षे यास बदलापुर पूर्व पोलीस ठाणे गु.र. नं 409/2024 कलम 377,324,323,504 भा.द.वि या गुन्हयाच्या तपासकामी ताब्यात घेण्यासाठी मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे येथील पोलीस अधिकारी व पथक हे तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे ट्रान्सफर वॉरंट सह गेले होते.
प्राथमिक माहिती नुसार सायंकाळी सुमारे 05.30 वा. सदर आरोपी यास नमूद पोलीस पथकाने तळोजा मध्यवर्ती कारागृह येथून ताब्यात घेतले व त्यास घेवून ठाणे येथे येत असताना, सुमारे 06.00 वा. ते 6.15 वा. चे दरम्यान पोलीस वाहन मुंब्रा वायपास येथे आले असता, सदर आरोपी अक्षय अण्णा शिंदे याने पथकातील पोलीस अधिकारी सपोनि/निलेश मोरे यांच्या कमरेचे सर्व्हिस पिस्तुल खेचून घेतले व पोलीस पथकाच्या दिशेने 03 राऊंड फायर केले.
त्यापैकी 01 राऊंड सपोनि/निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला व 02 राऊंड इतरत्र फायर झाले. स्वसंरक्षणार्थ पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीच्या दिशेने 01 गोळी फायर केली असता आरोपी अक्षय अण्णा शिंदे यास लागून तो जखमी झाला. पोलीस पथकाने तात्काळ जखमी पोलीस सपोनि / निलेश मोरे व आरोपी अक्षय अण्णा शिंदे यास उपचारकामी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय, कळवा येथे आणले असता, डॉक्टरांनी तपासून सपोनि/निलेश मोरे व इतर पोलीस यांना पुढील उपचारकामी ज्युपिटर हॉस्पीटल, ठाणे येथे रेफर केले असून, आरोपी अक्षय अण्णा शिंदे यास तपासून मयत घोषित केले आहे.
सदर मृत आरोपीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन नियमानुसार सर जे जे हॉस्पीटल, मुंबई येथे करण्याची तजवीज ठेवली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com