जि. प. शाळा, तांदुळवाडी येथे पो. काका पो. दिदी कार्यक्रम अंतर्गत मोबाईल वापर सबंधित जागृती..!
उपसंपादक : मंगेश उईके
पालघर:-सफाळे. पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या “जनसंवाद” अभियानांतर्गत सफाळे पोलीस ठाणे येथील प्रभारी पोलीस अधिकारी दत्ता शेळके सपोनि. यांच्या मार्गदर्शनाखाली, सफाळे पो. ठाणे कार्यरत प्राजक्ता पाटील पो. उप. निरीक्षक आणि महेंद्र शर्मा- पो. ह. सरोज भोसले – शेळके म. पो. कॉं. यानी सफाळे पोलीस ठाणे कार्यकक्षेत येणाऱ्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळा तांदुळवाडी, ता. जि. पालघर.येथे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या साठी, पोलीस दादा, पोलीस दिदि मदत, आणि आजच्या घडीला समाजातील तरूण वर्गाकडून होणारा वापर व त्यामुळे परिणाम याबाबत माहिती देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला.


यावेळी महिला पोलीस प्राजक्ता पाटील यांनी बालकांच्या सुरक्षेसाठी काय करावे, याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, मुले आणि मुलींनी शाळेत किंवा रस्त्याने जात येत असतांना, अन ओळखी व्यक्तीने आपले नाव गाव आदी काही विचारले असतांना सांगू नये किंवा दिले तर घेऊ नये. आपणास जर कोणी त्रास देत असेल किंवा काही चित्र विचित्र घडत असेल ते पाहून घाबरून नका. त्या संबंधित माहिती शाळेत लावलेल्या तक्रार पेटीत कागदावर लिहून टाकावी किंवा शिक्षणासाठी आपल्याला आई/ वडील यांनी दिलेल्या मोबाईल वर ११२ नंबर डायल करून माहिती देणे. किंवा आपल्या रक्षणासाठी असलेल्या पोलीस दादा / दिदी यांना सांगवी. आपल्याला लगेच मदत मिळेल. आधुनिक विज्ञानाच्या काळ आहे. मोबाईल मुळे आपण अमेरिकेतील व्यक्ती बरोबर क्षणात बोलू शकतो. ऑनलाईन शिक्षण पध्दती मुळे प्रत्येक विद्यार्थी यांच्या हातात मोबाईल आला आहे. परंतु मोबाईलच्या जास्त वापरामुळे, संस्कार, नितिमत्ताचा विसर पडत आहे. त्यामुळे मानसिक चीडचीड, अनिद्रा आदी निर्माण होतात. तसेच मोबाईल फोन आणि सोशल मीडियाचा होत असलेले गैरवापर, उदाहरणार्थ सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर टाकणाऱ्यावर सुध्दा गुन्हे दाखल होतात. असेही सांगण्यात आले. कार्यक्रमातील विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या अडचणी समजून घेत त्यावर योग्य ते मार्गदर्शन प्राजक्ता पाटील मॅडम,प्रमाणे महेंद्र शर्मा पो. हवा. व भोसले मॅडम यांनी ही आपल्या आप आपल्या परीने केले. यावेळी शालेय शिक्षण समिती पदाधिकारी, शाळेतील शिक्षक गण, सुजित पाटील – पोलीस पाटील, पोलीस ठाणे शांतता कमिटी सदस्य महेंद्र ठाकूर ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com