गोंदिया पोलीस सायबर क्राईम तर्फे जनजागृती संदेश..

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :
ऑनलाईन बनावटी गेमिंग अँपद्वारे शुद्ध फसवणूक,…सावधानतेचा इशारा..
याबाबतीत थोड्क्यात माहिती अशी की, आजच्या धकाधकी च्या जीवनात जिवन सुखकर व्हावा लवकरात लवकर कोणतेही काम न करता केवळ ऑनलाईन गेम, खेळाचे माध्यमातून लवकर श्रीमंत होण्याकरिता लोकांचा विशेषतः युवा वर्गाचा कल ऑनलाईन गेमिंगकडे वाढलेला दिसतो आहे.
ऑनलाईन गेम खेळण्यासाठी विवीध कंपनीचे अधिकृत गेम ॲप सारखे बनावटी गेम ॲप तयार केलेले ॲप डाउनलोड करण्यासाठी नागरिकांना आमिष दाखवून प्रलोभन देवुन प्रोत्साहित केले जाते. आणी त्यासाठी सोशल मीडियाची साधनांचा जसे वॉट्सॲप, मेसेंजेर, टेलिग्राम चॅनल, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी द्वारे नामांकित सिलेब्रिटी च्या विज्ञापनाद्वारे ऑनलाईन बनावटी गेमिंग अँप मध्ये खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. आणि विश्वास दिला जातो की यात कुठलाही प्रकारचा धोका अथवा फसवणूक होत नाही. तर बरेच लोक त्यांचे कंपनीचे ॲप द्वारे श्रीमंत झालेली आहेत. ज्यामुळे विषेतः युवा वर्ग, नागरिक अश्या गेमिंग ॲपवर विश्वास ठेवून लवकर श्रीमंत होण्याच्या नादात याकडे ओढली जातात आणि स्वतः चा आर्थिक नुकसान करून घेतात..... ऑनलाईन बनावटी गेमिंग हा गुन्हा असून त्यामध्ये फसवणूक झालेले लोक/ बळी पडले असल्याचे दिसून येत आहेत.

खालील उदाहरणं वरून काही महत्वाच्या बाबी समजून घेण्याची गरज आहे..
नुकतेच गोंदिया येथील रहिवासी आरोपी सोनटू नवरतन जैन राहणार सिविल लाईन गोंदिया याचे घरी छापा कारवाई नागपूर पोलिसांतर्फे करण्यात आली सदर कारवाईमध्ये आरोपी चे घरून मोठ्या प्रमाणात रोकड , सोने- चांदीचे दागिने नागपूर पोलीसांनी जप्त केले असून यामध्ये ऑनलाइन बनावटी गेमिंगच्या माध्यमाने फिर्यादीची फसवणूक झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.
सदर प्रकरणात आरोपीने फिर्यादीला ऑनलाईन गेमिंग च्या माध्यमाने करोडो रुपये कमाविता येतात असे आमिष व प्रलोभन देवुन युजर नेम ,आयडी पासवर्ड देवुन ऑनलाईन लिंक वर गेमिंग खेळण्याची सवय लावून पॉइंट परत होणार नाही कळवून ऑनलाईन बनावटी गेमिंग अँपवर खेळण्यास भाग पाडले . फिर्यादी ऑनलाईन जुगार खेळत असताना त्याचा फायदा फिर्यादी ला न होता तो थेट आरोपीलाच होत होता...... तसेच पाठविलेली लिंक आरोपीने बनावटी तयार करून त्यात सेटिंग व मेन्यूपूलेशन केले असल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरोपीला पैसे परत करण्याची मागणी केली असता आरोपीने फिर्यादिस जिवे मारण्याची धमकी देऊन करोडो रुपयांची फसवणूक केली.
आता समजून घेवूया ऑनलाईन गेमिंग काय प्रकार आहे आणि तो कसा खेळला जातो……
1) अशी अँप जी प्ले स्टोर्स किंवा अनोळखी लिंक द्वारे पाठविली जाते. ज्यावर क्लिक करून इंस्टॉल केली जाते…
2) ऑनलाईन बनावटी गेमिंग अँप डाऊनलोड करून इंस्टॉल केल्यानंतर विवीध प्रकारच्या अधिकृत गेमिंग ॲप मध्ये असणारे गेम जसे – फैटसी क्रिकेट, फुटबॉल, व्हालीबॉल, फूट बॉल, कॉर्ड गेम्स, ज्यात- रमी, पोकर, call Break, विनपत्ती, स्पोर्टस गेम- आर्चेरी , कॅजुल गेम- लुडो, स्नेक अँड ल्याडर, कॅरम, पुल, रनर नः १, ओपीनीमा, आर्केड गेम – फुट-चॉप, फुट डार्ट, पझल गेम- Bubble shooter Block puzzle, क्रेन गेम, यासारखे असणारे बनावटी गेमिंग अँप सुद्धा असतात. आपणास अधिकृत व बनावटी गेमिंग अँप मध्ये फरक समजून येत नाही. ऑनलाईन बनावटी गेमिंग अँप सुरवातीला बोनस पैसे 5 हजार ते 3 लाख रुपयांपर्यंत चे आमिष देऊन आपल्यास खेळण्यास उत्तेजन देतात. सुरवातीला आपले पैश्यावर जास्त परतावा देवुन किंवा जास्त गेम मध्ये जिंकू देतात…….
जसे जसे लोक किंवा युवा वर्ग खेळाच्या ॲप वरून पैसे जिंकतात तेव्हा जास्त पैसा कमवायच्या लालसेपोटी जास्त रक्कम वर खेळ खेळला जातो…. सर्व खेळणाऱ्यांना विश्वास असतो की या खेळामध्ये कोणतीही हानी किँवा विश्वासघात करणारी सिस्टंम नाही ज्यामुळे आपण खेळत असलेल्या गेममध्ये विश्वास ठेऊन पैश्याचा जुगार वाढवीत जातात…….. अश्या वेळी आपण ज्या लोकानसोबत ऑनलाईन खेळत आहोत ते खरे जिवंत व्यक्ती नसून संगणकीय आभासी व्यक्ती आहेत जे आपल्यासोबत खेळून आणि रक्कम फार मोठी झाल्यानंतर संगणकाचे कोडिंग चे मदतीने खेळानाऱ्यास जिंकू देत नाहीत व त्यामुळे खेळणाऱ्याचे ऑनलाईन बनावटी गेमिंग अँप द्वारे मोठी आर्थिक फसवणूक होते. ऑनलाईन बनावटी गेमिंग अँप मध्ये विविध खेळ खेळणे करीता पॉईंट किंवा चिप्स ची आवश्यकता असते. सुरवातीला मिळालेला बोनस संपल्यावर नवीन पॉईंट किंवा चिप्स मिळविणे/खरेदी करीता ऑनलाईन बनावटी गेमिंग अँप मध्ये ऑनलाइन बँकिंग द्वारे/ ऑफ लाईन शॉप द्वारे किंवा रोख रक्कम त्या कंपनीशी संबंधित व्यक्तीला दिली जाते व तो व्यक्ती पैसे मिळाल्यावर तो ऍडमिन पॅनल द्वारे आभासी चलन पॉईंट मध्ये किंवा चिप्स मध्ये त्याचे युजर आयडी वर ट्रान्स्फर केले जाते. यामध्ये पैसे घेणारा जरी आपले जवळ असतो परंतु ऑनलाईन बनावटी गेमिंग अँप बनविणारा व चालविणारा जगात कुठेही असू शकतो .
ऑनलाईन बनावटी गेमिंग अँप कसे तयार केले जाते….
ऑनलाईन बनावटी गेमिंग अँप चा उद्देश मोठ्या प्रमाणावर लोकांची फसवणूक करून जास्तीत जास्त लोकांकडून पैसे लुबाडण्याचा असतो . याकरिता लागणारी ऑनलाईन बनावटी गेमिंग अँप तयार करणेकरीता ऑनलाइन फ्री लान्सर , प्रोग्रामर सर्वत्र उपलब्ध असून ऑनलाईन बनावटी गेमिंग अँप चे ऍडमिन पॅनल तयार करून त्याद्वारे हवे त्याला जिंकवीता येते आणि हवे त्याला हरविता येते. त्याकरिता सर्व कंट्रोल ऑनलाईन बनावटी गेमिंग अँप चे ऍडमिन पॅनल मध्ये दिलेले असते.
ऑनलाईन गेमींग ही शुद्ध फसवणूक आहे- कारणे…
उदाहरणे ……
1) तीनपत्ती खेळ खेळणे हे महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा ठरतो . यामध्ये बनावटी फसव्या युक्त्या केल्या जातात. ऑनलाईन बनावटी गेमिंग अँप मध्ये तीन पत्ती मध्ये खेळत असलेल्या सर्व व्यक्तीचे पत्ते काय आहेत हे ऑनलाईन बनावटी गेमिंग अँप चे ऍडमिन पॅनल मध्ये दिसत असतात व आपले सोबत जिवंत व्यक्ती खेळत नसून संगणकीय आभासी व्यक्ती आपणासोबत खेळत असतात…..तीनपत्ती गेम मध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये संगणकीय आभासी व्यक्तीला जिकंण्याकरीता आवश्यक तेवढे पैसे त्याचे अकाउंट मध्ये दिले जातात व आपणास सर्वात मोठी रक्कम भरा किंवा गेम सोडा अशी स्थिती निर्माण करून आपली मोठ्या रकमेची फसवणूक केली जाते…….. सरतेशेवटी ऑनलाईन बनावटी गेमिंग अँप द्वारे आपली मोठी आर्थिक फसवणूक होते.
ऑनलाईन रमी मध्ये खेळत असलेल्या सर्व व्यक्तीचे पत्ते काय आहेत हे ऑनलाईन बनावटी गेमिंग अँप चे ऍडमिन पॅनल मध्ये दिसत असतात व आपले सोबत जिवंत व्यक्ती खेळत नसून संगणकीय आभासी व्यक्ती आपणा सोबत खेळत असतात. तुम्ही ऑनलाईन रमी खेळत असतांना खेळ पुर्ण करण्याकरीता शेवटी लागणारा पत्ता कोणता असू शकतो याबाबत संगणक प्रणाली स्वतः ते पत्ता आपणास मिळणार नाही अशी सेटिंग करू शकतात व त्यामुळे आपण कधी जिंकणार व कधी हरणार याची पुर्ण यंत्रणा फिक्स केलेली असते. व त्या गेमवर, विश्वास ठेवून लालच केल्यास आपणास फारच मोठी आर्थिक हानी होते.
2) बनावटी ऑनलाईन लुडो गेम मध्ये असल्यावर डायस मध्ये कीती अंक यावे याचीही पूर्व नियंत्रण असलेली संगणक प्रणाली कोडींग असते.
सायबर क्राईम ऑनलाईन गेमिंग जागरुकता म्हणुन नागरिक, युवा वर्ग यांनी काय काळजी घ्यावी काय करू नये याबाबत दक्षता…
▪️ विवीध गेमिंग ॲप द्वारें अधिकृत असणाऱ्या अँप सारखी बनावटी ॲप ची लिंक व यूजरनेम व पासवर्ड पुरविण्यात येतो. अशी कोणतीही गेमिंग ॲप डाऊनलोड अथवा लिंक इंस्टॉल करु नये.
▪️ विवीध कंपनीच्या बनावटी गेमिंग ॲपच्या प्रलोभनाला किंवा आमिषाला बळी पडून लवकरात लवकर श्रीमंत होण्याच्या नादात स्वतः चे आर्थिक नुकसान करून घेऊ नये.
गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे जिह्यातील जनतेस, नागरिकांना, विशेषत. युवावर्ग यांना आवाहन करण्यात येत आहे की, सतर्क आणि जागरूक राहणे आवश्यक आहे. कोणत्याही ऑनलाईन गेमिंग ॲप च्या फांद्यात न पडता कुठल्याही प्रकारच्या जलद श्रीमंत होण्याच्या आमिष, प्रलोभनाला पडू नये ............. जिल्ह्यातील जनतेस, नागरिकांना युवा वर्ग यांना त्यांची ऑनलाईन बनावटी गेमिंग ॲपच्या माध्यमाने मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले असल्यास आपली तक्रार ऑनलाइन - https://cybercrime.gov.in/ या पोर्टल वर नोंदवावी . तसेच गोंदिया जिल्हा पोलीस दलाशी संपर्क साधावा. जिल्हा पोलिस दल सदैव आपल्या हिताकरिता प्रयत्नशील आणि तत्पर आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com